Posts

Showing posts from 2016
Image
नोटबंदी ५०० - १००० च्या नोटा गेल्या  चलनातून  बाहेर काळा- पैसा वाला कापे भीतीने थरथर सामान्य जनता आहे जाम खुशीत तयार ताटकळत थांबायला रांगेत ! नोटबंदीने दहशदवाद्याचे मोडले कंबरडे जाली नोट छापणारा धाय मोकलून रडे अवैध संपत्ती आणि ज्यांनी भरला नाही कर त्यांचा मागे लागला चांगलाच घोर ! कष्टाची ज्यांची आहे कमाई नाही त्यांना कसलीच  चिंता आणि घाई तो करतो नोटबंदीचे स्वागत रात्री शांत झोपतो गाणे गुणगुणत ! काळ्याचे पांढरे करण्याची चालू धावपळ कोणी देतो कमीशन कोणी घालतो गळ भ्रष्ट्राचाराची  धेंडे आहेत ही चोर  नुकसान देशाचे केले यांनी फार ! विरोधक म्हणती ही आहे सावर्जनिक लूट नियोजनाची म्हणे लागली पुरती वाट तेव्हा राधा-सुता कोठे गेला  होता तुझा धर्म घोट्याळ्यांचे  जेंव्हा घडले तुमच्याहातूनच  कर्म ! सत्ताधा-यांनीही  न जावे जास्त शेफारून देश पुढे न्यावा सर्वांनां सोबत घेऊन न वाजवावी सतत स्वतःचीच टिमकी जनता सुज्ञ जाणायला काय जमा काय बाकी ! घडून येत आहे  हि अर्थक्रांती देशाची होईल यातून प्रगती सहन करूया ...
Image
लहानपण देगा देवा ...  देवा तुझ्याकडे मागतो एक छोटसं मागणं कर मला परत  एकदा  लहान असेल निर्व्याज, निर्मळ, सुंदर मन नसेल वासना, असूया, इर्षेची त्यात घाण ! घालेल मी कोणताही पेहराव फॅशनची नसेल कसलीच हाव झाली जरी मित्रांसोबत भांडणे आणि कट्टी थोड्यावेळातच जमून जाईल आमची पुन्हा गट्टी ! नसेल घड्याळ्याच्या काट्यावरची कसरत खेळत घालवील दिवस रमत-गमत नसेल कोणतीच माझ्यावर जबाबदारी आयुष्य असेल ते फारच भारी ! नसेल कोणती चिंता आणि घोर रंगवेन मी छान चित्रातील मोर जरी कधी बसलो मी रुसुन हट्ट पुरवला की बघेन हसून ! नसेल कोणतीच स्पर्धा ही जीवघेणी नाचत म्हणीन मी बडबड गाणी सगळं जग वाटेल मला छान-छान रमून जाईल त्यात माझे बालपण ! सगळेच करतील माझा लाड लाडाने आई-बाबा म्हणतील आहे मी लबाड नाही लागणार मला मान आणि सन्मान माहित नसेल मला काय असतो अपमान ! नसेल जाती-पातीचा मनात विचार गरीबी-श्रीमंती ना पडणार वागण्यावर  असर दंगा-मस्ती करण्यास मिळाले सवंगडी चार आनंदाचा सोहळा होईल साकार ! काय कामाचे देवा असले हे मोठेपण जीव माझा गेला पुरता  रे  वैतागून जग...
Image
आले आले गणपती आले  आले आले गणपती आले घर आनंदाने न्हाहून निघाले ! आले आले गणपती आले आले आले गणपती आले लहान- थोर बेभान नाचू लागले ! आले आले गणपती आले आले आले गणपती आले शंकर- पार्वतीस कैलासी करमेनासे झाले ! आले आले गणपती आले आले आले गणपती आले उंदीर मामाचे महत्वं वाढियले ! आले आले गणपती आले आले आले गणपती आले मोदकांचा नैवद्य, पंचआरतीने ओवाळिले ! आले आले गणपती आले आले आले गणपती आले दुर्वा वाहून त्यास गुलाल उधळिले ! आले आले गणपती आले आले आले गणपती आले गौराईचे उमटती त्यासोबत पाऊले ! आले आले गणपती आले आले आले गणपती आले चहूकडील वातावरण गणेशमय झाले ! आले आले गणपती आले ©  महेश भा. रायखेलकर
Image
मित्र /मैत्री  प्रसंगी धावून येईल तो खरा मित्र पार्ट्या झोडायला जमेल कोणीही पुत्र अपयशामध्ये धीर देईल तो खरा सखा यशाचा वाटेकरी बनेल कोणीही परका ! जीवाला जीव देईल ती खरी फ्रेन्डशिप कोणीही जमतील गप्पा मारायला चिप दुःखाचे अश्रू  पुसेल तो खरा सोबती आनंदाचा बनेल कोणीही  सभापती ! खांद्याला  खांदा  देवून लढेल तो खरा सवंगडी नुसतेच खेळायला येईल कोणताही गडी अडचणीत मदत करेल ती खरी मैत्री तयार कोणीही खिशाला लावायला कात्री ! धरती वरचे सर्वात नाते हे सुंदर जसे भगवंताने गुंफले पवित्र मंदीर मैत्री म्हणजे  देवाचे अनमोल वरदान टिकून राहावी  जोपर्यंत कुटीत आहेत  प्राण ! टिकून राहावी जोपर्यंत कुटीत आहेत प्राण !! ©  महेश भा. रायखेलकर
Image
चला करुया आपलीच कोणी बहीण आहे अडाणी, चला बघुया  घेता येईल का तिची शिकवणी ! आपलाच कोणी बांधव राहतो वस्त्रावीण उघडा, चला त्याच्या अंगात घालू  नवीन कपडा ! बापासम आपल्या कोणी वृद्ध आहे उपाशी , चला देवु आपल्यातील चटणी भाकर त्याशी ! कोणी आपलीच  माता होई आजाराने बेजार, चला करुया तीच्यावर औषधोपचार ! आपलीच काही लेकरं आहेत निराधार, चला बनून पालक त्यांचे देवूया आधार ! आपल्याच  काही घरातील अंगणे पडलीत  घाण, चला साफ  करुनी त्यांना बनवूया छान !  आपल्याच  काही घरातील माठ पडले   कोरडी, चला टाळूया करायला पाण्याची नासाडी ! गौरवाने म्हणतो आपण `सारे विश्वच माझे घर' चला त्या दिशेने उचलूया पाऊले चार ! चला त्या दिशेने उचलूया पाऊले चार !! ©  महेश भा. रायखेलकर 
Image
येऊ द्या मला या जगात  नका आई बाबा नका मला मारू, मी तुमच्या रक्ताचे आहे की हो लेकरू ! नका, नका , नका बनू असे तुम्ही  असुरी, आपल्याच काळजावर चालवता काहो  कुणी  सुरी ! चला येऊ द्या मला या जगात, आजी आजोबांची असेन  मी लाडकी नात ! नका घेऊ आता कोणतीही आडकाठी, तुमच्या म्हातारपणाची बनेन मी काठी ! बनेन कोणाची बहीण आणि   सून , करा माझ्या जन्माचे स्वागत हसून   ! येण्याआधीच माझे नका करू बंद दार, तुमच्या ऋणात मी आजन्म राहणार ! द्या देवाच्या दानाला तुम्ही प्रतिसाद,  माझ्या जन्माचा करा , साजरा आनंद ! माझ्या जन्माचा करा,  साजरा आनंद !! ©  महेश भा. रायखेलकर 
Image
सेल्फी  कर विचार तू धोक्याच्या ठिकाणी  काढतांना 'सेल्फी ', मृत्यू नाही खाणार ना  तूला, तुझी करुनी कुल्फी ! कसला हा जडला प्रसिद्धीचा हव्यास, जीवाचीही पर्वा करेना माणूस  आज ! करू नकोस कोणतेही वेडे  धाडस, तू आहेस रे कोणाचातरी  श्वास ! मान्य हौसेला नसे कोणतेही मोल, पण जीवन त्या पेक्षा आहे रे अनमोल ! वेळीच 'सेल्फी ', या व्यसनाला लावा रोक कॅन्सर पेक्षा भयानक पसरे हा रोग ! नुसते 'सेल्फी ' काढण्यात आले कसले रे कर्तृत्व, कोणाच्यातरी शोधा मूळे मिळाला तूला हा  वाव ! मिळव तूही  तुझ्या जीवनास अशी  काही मान्यता , तुझ्या सोबत 'सेल्फी ' काढण्यात मानतील इतर धन्यता !! तुझ्या सोबत 'सेल्फी ' काढण्यात मानतील इतर धन्यता !! ©  महेश भा. रायखेलकर 
Image
पुढारी मी  या गावचा पुढारी नका दाखवु मला तुमची हुषारी मी करेल कोणताही चमत्कार मला पाहूनी घाला तुम्ही नमस्कार ! नका पुसू मला  शिक्षण-बिक्षण नाही लागले त्यात माझे कधीच मन मला नसे कोणतेही बंध मुल्य-संस्कारांशी माझा काय संबंध ! मी घालतो कपडे व्हाईट नजर आहे म्हंति माझी वाईट मी म्हणे समाजाचे कल्याण करीन असे केले तर मी उपासी मरीन ! मी म्हणेल ते केलेच पाहिजे समाजाचे माझ्यावर अपेक्षांचे ओझे पैशाचा आहे माझ्याकडे रतीब त्यामुळे पटकावेल मी कोणताही किताब ! पाळतो मी नेहमीच गुंड शमवेल मी कोणतेही बंड जरी सुटला माझ्या पोटाचा नगारा चहूकडे आहे माझा दरारा ! म्हणे मी करतो राजकारण हे तर आहे माझे समाजकारण नका घेऊ शंका तुम्ही विनाकारण या मधून साधले मी अर्थकारण ! पाच वर्षात एकदा मागेल जोगवा नका घेऊ नंतर तुम्ही माझा मागोवा मी काय घेतलाय सगळ्यांचा मक्ता फ्यामिली साठी  राबवतोय मी  सत्ता ! असलो जरी   मी गावचा पुढारी आहे  एक  स्वप्न माझ्या ऊरी घेईल एके  दिवशी उंच भरारी होईल स्वागत माझे  दिल्ली दरबारी ! ह...
Image
सत्कर्माची 'श्रद्धा' तुम्ही लोकांना संकटात मदत करा, हजारो हात येतील तुम्हास मदतीस, तुमच्या  संकटात ! यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !! तुम्ही लोकांना यशाचा मंत्र  शिकवा, ते करतील तुमच्या यशाची विधात्त्याकडे कामना ! यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !! तुम्ही  निराधाराचा व्हा आधार, जीवनात कधीच होणार नाहीत तुम्ही निराधार ! यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !! तुम्ही भुकेल्याला अन्न द्या, अन्नदेवता असेल कायमची तुमच्यावर प्रसन्नः ! यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !! तुम्ही दुस-याला  आनंद द्या, दुखा:ची सावली नाही पडणार तुमच्या आयुष्यावर ! यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !! तुम्ही लोकांस मान- सन्मान द्या, इतरही   होतील तुमच्या समोर विनम्र ! यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !! तुम्ही लोकांचा द्वेष करा,  लोक पाहतील तुम्हाला  पाण्यात !   यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !! तुम्ही सत्कर्माविषयी बाळगावी  श्रद्धा ईश्वर ही उभा राहील  पाठी सदा दुष्कर्माची होऊ देउ नये...
Image
  ना जमे  तल्लीन होवूनी  ऐकतो गीतरामायण रामा सारखा पुत्र बनणे ना जमे ! टिव्हीवर पाहतो महाभारत मालिका कर्णा सारखा दाता होणे ना जमे ! गोकुळअष्टमीला फोडतो गगनचुंबी दहीहंडी कृष्णा सारखा सखा होणे ना जमे ! जोमात साजरी करतो  शिवजयंती शिवाजी सारखा राज्यकर्ता  बनणे ना जमे ! दहा दिवस साजरा करतो गणेश उत्सव गणेशा सारखा ज्ञानी होणे ना जमे ! होळीपौर्णिमेला पेटवितो होळी दुर्गुणांची होळी करणे ना जमे ! रंगपंचमीला उधळतो रंग जीवनाला  रंग देणे ना जमे ! आनंदाने साजरी करतो दिवाळी दुस-याच्या जीवनातील अंधार  दूर करणे ना जमे ! सोने लुटुनी दस-या दिवसी करतो सिमोल्लंघन विचारांची चौकट मोडणे ना जमे ! नऊ दिवस करतो देवीची आराधना दुर्जंनांचे निर्दालन करणे ना जमे ! पुरणपोळी खिलावुनि साजरा करतो बैलपोळा प्राणी-मात्रा वर दया करणे ना जमे ! करतो व्रतवैकल्ये आणि उपासतापास काम,क्रोध,मोह,मत्सर त्यागणे ना जमे ! वर्षभर साज-या करतो आदर्शांच्या जयंत्या त्यांच्यातील एकही गुण घेणे ना जमे ! कर्मकांड उत्सवात गेलो इतके गुंतून ते करण्यामागचा विचार...
Image
दुष्काळ पडला भीषण दुष्काळ मानवाचा बनला जसा तो काळ नदी, विहरी,धरणे आज आटली पाण्यावाचून शेतजमीन कोरडी पडली ! पाणी म्हणजे  जीवन त्यासाठी माणूस फिरे आज वणवण आपणच साधली ही अधोगती चालवून  वृक्षांवर कु-हांडांच्या पाती ! काय कामाची साधून नुसती प्रगती जनावरे,पशुपक्षी पाण्यावाचून मरती चहुकडे पसरवली सिंमेटची  जंगले त्यात पाण्याचे दुकाने थाटले ! बोरं मारुनी  केली जमिनीची  चाळण जेवढे ओरबाडून घ्यायचे तेवढे घेतले ओरबाडून धरणीमातेचा मायेचा झरा गेला आज आटून ते पाहून अश्रू  आले डोळ्यात दाटून ! काहींना दुष्काळाची नसे बसे झळ साठमारी करुनी करती चंगळ माणुसकीच्या विरुद्ध त्यांचे हे वागणं जसे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणं ! प्रगती साधतांना बाळगावी लागेल शुद्ध उचलणार नाही  एकही पाऊल निसर्गाच्या  विरुद्ध करू पाण्याचे नियोजन तात्काळ टाळू भावी पिढ्यांच्या जीवनातील  दुष्काळ! लावूया  झाडे वाचवूया पाणी देवुन  मदतीचा हात, पुसू  डोळ्यातील पाणी जरी असली आता  निसर्गाची  अवकृपा माणुसकीचा ओढा मात्र सर...
Image
       बंम्प्या मला वाटे दिवसभर मस्त मित्रासोबत खेळावे अधूनमधून टीव्ही वर कार्टून पहावे कशाला हवी ही परिक्षा बिरिक्षा लहान पणीच आम्हालाच केवढी मोठी ही शिक्षा पाठीवरी माझ्या दप्तराचे ओझे जरी झाले ते मला नकोसे क्लास मध्ये टीचर बोलती इंग्रजी फाड फाड मला मात्र वाटे सर्वच जड जड वीक मध्ये दोन दिवस   हॉलीडे होमवर्क चा तर रोजचाच डे  स्प्लेल्लिंग टेबल घेती आई घोकून  घोकून जरी गेलो मी पुरता थकून स्कुल मध्ये अधे मधे वेगवेगळे कॉम्पिटिशन माझे असते त्यात पार्टीशिपेशन आई बाबांना व्हावे वाटे मी स्मार्ट यासाठी सर्व क्लास्सेस आहेत स्टार्ट          आई माझे पुरवी सर्वच लाड बाबा म्हणती त्या मुळे होईल मी म्याड आबांशी माझी चांगलीच गट्टी सांगतात  रोज ते  नविन  छान छान गोष्टी नवीन नवीन गिफ्ट  असे  मला हवे मधे  मधे  आईसक्रीम वाटे खावे कधी कधी खावी गाडीवर भेळपुरी नाहीतर आई ने करावी घरीच पाणीपुरी बाबा आहेत माझे कडक कडक बोलतात ते रागान...
Image
तूच, तू तूच राणी लक्ष्मीबाई तूच जिजाऊ आहेस कणखर आणि तू लढाऊ तूच सावित्री, अहिल्या तूच मदर टेरेसा समास सेवेचा  हाती घेतलास  तू  वसा तूच  इंदिरा गांधी  आणि  तूच प्रतिभा तुझ्या कर्तुत्वाचा कळस भिडलाय  आज नभा तूच गाणकोकिळा, तूच माधुरी गौरवलीस तू बनुनी जगत सुंदरी तूच कल्पना चावला, तूच पी.टी उषा निराश मनात फुलवी तू आशा तूच आई  आणि   तूच बहीण तूच कन्या अन तूच सहचारीण तूच दुर्गा , तूच कुलस्वामिनी शांत, शीतल प्रसंगी तू दामिनी तूच सानिया मिर्झा, तूच कोम मेरी प्रेत्येक क्षेत्रात घेतलीस तू उंच भरारी तूच किरण बेदी, तूच साईना नेहवाल तुझ्या मुळे  प्रत्येक घर आनंदी खुशाल तूच  लक्ष्मी आणि  तूच सरस्वती युगान,युगे समस्त मानव जात तुज पूजती  युगान,युगे समस्त मानव जात तुज पूजती ©  महेश भा. रायखेलकर
Image
मला लागली सरकारी नौकरी  मला लागली आज सरकारी नौकरी लग्नासाठी मिळून जाईल आता  छानशी छोकरी ! शिपायाची जरी असली माझी पोस्ट कायमची झाली ना राव ही गोष्ट ! कोणी मला सुचवलं मी करावा व्यवसाय कष्ट करण्याची हो कोठे आपल्याला सवय ! रमत गमत येथे काम मी करीन अधुनमधून कॅन्टीन मध्ये चहा जावून पिईन ! फार कंटाळा आला तर जाईन रजेवर नाहीच मंजुर केली तर आहेच मेडीकल ! धंद्यासाठी घ्यावी लागते फार मोठी जोखीम बापजाद्यांनी आमच्या  केली नाही फत्ते ही मोहीम ! आम्ही तरी कसे करावे काही  वेगळे धाडस त्यापेक्षा बरे चिकटलो सरकारी पदास ! काही झाले तरी  नोकरी न जाई म्हणून तर म्हणती आम्हास सरकारचे जावई  ! लग्नाच्या बजाराचेही ठावूक मला इंगीत सरकारी नौकरीने टाकलय सगळ्यांना गुंगीत  ! म्हणून सांगतो तुम्हाला ऐका माझे राव सरकारी नौकरीची सोडू नका तुम्ही हाव  ! १० ते ५ असी ड्युटी मी करीन संध्याकाळी बायको सोबत गप्पा मी  मारीन ! सणवार - रविवार असेल मला सुट्टी कामाची तर आहे कोठे आपली गट्टी ! वरचेवर मिळेल मला महागाई भत्ता सरकारला देख...
Image
सैनिकहो तुमच्यासाठी  देशाच्या सीमेचे करता तुम्ही रक्षण म्हणुन आम्ही उपभोगु शकतो चार आनंदाचे क्षण ! प्रतिकूल परीस्थितीशी  करता तुम्ही सामना आहे आदर तुमच्याबद्धल आमचीया  मना ! कुटुंबापासून दूरदेशी असता तुम्ही तैनात  राहू शकतो आम्ही त्यामुळे मुलाबाळांसोबत घरात, सुखात ! वेळप्रसंगी प्राणाचे करिता तुम्ही बलिदान यास्तव देशाचे अढळ आहे जगात स्थान ! पराक्रमी आणि आहात तुम्ही शूरवीर शत्रूची करावी आम्ही कशाला फिकीर ! भारतमाता आहे तुमच्यामुळे सुरक्षित जन-गण-मनाचे स्थान राहणार अबाधीत ! आहोत आम्ही  पक्के हे जाणून देश संकटात पडला कि येणार तुम्ही धावून ! आज आम्ही तुम्हाला देतो एक वचन तुमच्यासम आम्हीही वाढवू देशाची आन- बान - शान  ! तुमच्यासम आम्हीही वाढवू देशाची आन- बान - शान  !! ©  महेश भा.  रायखेलकर 
Image
जन्म घे आई परत फिरुनी  जन्म घे आई परत फिरुनी सांभाळीन तुला तुझा बाबा होवुनी करील मी माया तेवढीच तुझ्यावर जेवढी कधी केली होतीस तु  माझ्यावर झोपवॆल तुला मी गाऊन अंगाई भरवील सुन तुला तुझी बनुन आई असशील तु  आपल्या घरची राजकुमारी गोरी, गोरी गोड,गोड जशी आली धरणीवर परी घेईल हळूच मी तुझ्या गालाचा पापा मारीन तुझ्यासोबत बोबड्या गप्पा खेळीन तुझ्या संगे मी लपंडाव संपला जरी एक सुरु होईल नवीन डाव नको अशी माझ्यावर रुसु तु गडे जरी मारली मी  एक टपली तुला लाडे लाडे ये नको करू आता फार उशीर तुला भेटण्यास झालो मी अधीर तुला भेटण्यास झालो मी अधीर ©  महेश भा.  रायखेलकर