चला करुया
आपलीच कोणी बहीण आहे अडाणी,
चला बघुया घेता येईल का तिची शिकवणी !
आपलाच कोणी बांधव राहतो वस्त्रावीण उघडा,
चला त्याच्या अंगात घालू नवीन कपडा !
आपलीच कोणी बहीण आहे अडाणी,
चला बघुया घेता येईल का तिची शिकवणी !
आपलाच कोणी बांधव राहतो वस्त्रावीण उघडा,
चला त्याच्या अंगात घालू नवीन कपडा !
बापासम आपल्या कोणी वृद्ध आहे उपाशी ,
चला देवु आपल्यातील चटणी भाकर त्याशी !
कोणी आपलीच माता होई आजाराने बेजार,
चला करुया तीच्यावर औषधोपचार !
आपलीच काही लेकरं आहेत निराधार,
चला बनून पालक त्यांचे देवूया आधार !
आपल्याच काही घरातील अंगणे पडलीत घाण,
चला साफ करुनी त्यांना बनवूया छान !
आपल्याच काही घरातील माठ पडले कोरडी,
चला टाळूया करायला पाण्याची नासाडी !
गौरवाने म्हणतो आपण `सारे विश्वच माझे घर'
चला त्या दिशेने उचलूया पाऊले चार !
चला त्या दिशेने उचलूया पाऊले चार !!
© महेश भा. रायखेलकर
चला देवु आपल्यातील चटणी भाकर त्याशी !
कोणी आपलीच माता होई आजाराने बेजार,
चला करुया तीच्यावर औषधोपचार !
आपलीच काही लेकरं आहेत निराधार,
चला बनून पालक त्यांचे देवूया आधार !
आपल्याच काही घरातील अंगणे पडलीत घाण,
चला साफ करुनी त्यांना बनवूया छान !
आपल्याच काही घरातील माठ पडले कोरडी,
चला टाळूया करायला पाण्याची नासाडी !
गौरवाने म्हणतो आपण `सारे विश्वच माझे घर'
चला त्या दिशेने उचलूया पाऊले चार !
चला त्या दिशेने उचलूया पाऊले चार !!
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment