येऊ द्या मला या जगात 


नका आई बाबा नका मला मारू,
मी तुमच्या रक्ताचे आहे की हो लेकरू !

नका, नका , नका बनू असे तुम्ही  असुरी,
आपल्याच काळजावर चालवता काहो  कुणी  सुरी !

चला येऊ द्या मला या जगात,
आजी आजोबांची असेन  मी लाडकी नात !

नका घेऊ आता कोणतीही आडकाठी,
तुमच्या म्हातारपणाची बनेन मी काठी !

बनेन कोणाची बहीण आणि   सून ,
करा माझ्या जन्माचे स्वागत हसून   !

येण्याआधीच माझे नका करू बंद दार,
तुमच्या ऋणात मी आजन्म राहणार !

द्या देवाच्या दानाला तुम्ही प्रतिसाद,
 माझ्या जन्माचा करा , साजरा आनंद !
माझ्या जन्माचा करा,  साजरा आनंद !!


© महेश भा. रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog