सेल्फी 

कर विचार तू धोक्याच्या ठिकाणी  काढतांना 'सेल्फी ',
मृत्यू नाही खाणार ना  तूला, तुझी करुनी कुल्फी !

कसला हा जडला प्रसिद्धीचा हव्यास,
जीवाचीही पर्वा करेना माणूस  आज !

करू नकोस कोणतेही वेडे  धाडस,
तू आहेस रे कोणाचातरी  श्वास !

मान्य हौसेला नसे कोणतेही मोल,
पण जीवन त्या पेक्षा आहे रे अनमोल !

वेळीच 'सेल्फी ', या व्यसनाला लावा रोक
कॅन्सर पेक्षा भयानक पसरे हा रोग !

नुसते 'सेल्फी ' काढण्यात आले कसले रे कर्तृत्व,
कोणाच्यातरी शोधा मूळे मिळाला तूला हा  वाव !

मिळव तूही  तुझ्या जीवनास अशी  काही मान्यता ,
तुझ्या सोबत 'सेल्फी ' काढण्यात मानतील इतर धन्यता !!
तुझ्या सोबत 'सेल्फी ' काढण्यात मानतील इतर धन्यता !!


© महेश भा. रायखेलकर 




Comments

Popular posts from this blog