हायकू कविता

गेले ते दिवस
राहिल्या आठवणी
डोळ्यात येई पाणी


माझी नजर
दूर जाते
ती जवळ येते

मनाच्या कुपीत
आहे ती अजून
माझे गोड गुपितं


स्त्री  असुरक्षित
कायदा व्यवस्था
टांगलीय वेशीत

मला  नसे कोणताही धर्म
माणुसकी
हेच माझे मर्म


दिवस जाता जाईना
रात्र सरता सरेना
काळ पुढे सरकेना

तो अजून लहान
मोठा जेव्हा होईल
'व्यवहार' त्याला कळेल

पैशाशिवाय मोठे
जगात काही नाही
तत्व मूल्य हरवले कोठे


किड्यामुंग्यांसारखे माणसाचे जीवन
रोज रोज मरतो
परत परत जगतो

फुलपाखरासारखे
मी हि उडावे
अलगद जगावे


© महेश भा. रायखेलकर



Comments

Popular posts from this blog