हायकू कविता
माझ्या घरी तू
येशील का
मीठ भाकरी खाशील का
*****************
तू श्रीमंत
मी गरीब
प्रेम विपरीत
*****************
परीक्षेत कॉपी
करून झालो पास
जीवनात नापास
***************
मीही प्रेमात
तुही प्रेमात
प्रेमाची जाहिरात
**************
तुझ्यासाठी
प्राण माझे देईन
जीव तुझा घेईन
************
तुमच्यासाठी
मी झिजलो
गाठली यंदा साठी
*************
प्रेमाची परीक्षा
पास झालो
संसारात अडकलो
*************
प्रियकर आणि नवरा
वेगवेगळा असतो
लग्नानंतर कळतो
**************
लग्न करून
पहावे
सुखाला मुकावे
*************
लग्नाअधी
होतो मी एकटा
आता हाती वरवंटा
*************
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment