हायकू कविता
१. शिळं फाटकं
दुस-याला न द्यावे
जे खावू घालू शकतो ते दान करावे
२. तूच आहेच तुझ्या
जन्माचा शिल्पकार
ज्योतिषांचा धंदा चालतो फार
३. पालक बालक
दोघेही मोबाईलवर
संवादाला घरघर
४. एक चंद्र नभात
एक तुझ्या चेह-यात
मी तुझ्या मोहात
५. नको अशी
लाजून तू पाहू
लाज झाली नकोशी
६. मी आहे निवांत
डबक्याला का असते
वाहण्याची भ्रांत
७. नको जावू मला सोडून
नाही जगणार तुझ्या वाचुन
यमालाही ठेवेन मी थोपवून
८. तुझं बोलणं
जसं पैंजणांचं वाजणं
माझं अबोल होणं
९. देवाने दिलय तुला भरभरून
नको जाऊस अशी तू मातुन
प्रेमाचे गीत गाऊ दोघे मिळून
१०. हे कसले आलेत संत
वासनेचे वळवळे
यांच्या मनात जंत
© महेश भा. रायखेलकर
१. शिळं फाटकं
दुस-याला न द्यावे
जे खावू घालू शकतो ते दान करावे
२. तूच आहेच तुझ्या
जन्माचा शिल्पकार
ज्योतिषांचा धंदा चालतो फार
३. पालक बालक
दोघेही मोबाईलवर
संवादाला घरघर
४. एक चंद्र नभात
एक तुझ्या चेह-यात
मी तुझ्या मोहात
५. नको अशी
लाजून तू पाहू
लाज झाली नकोशी
६. मी आहे निवांत
डबक्याला का असते
वाहण्याची भ्रांत
७. नको जावू मला सोडून
नाही जगणार तुझ्या वाचुन
यमालाही ठेवेन मी थोपवून
८. तुझं बोलणं
जसं पैंजणांचं वाजणं
माझं अबोल होणं
९. देवाने दिलय तुला भरभरून
नको जाऊस अशी तू मातुन
प्रेमाचे गीत गाऊ दोघे मिळून
१०. हे कसले आलेत संत
वासनेचे वळवळे
यांच्या मनात जंत
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment