फिरस्ते
उघडयावरच चाले यांचा संसार
वर आकाशाचे छत, खाली धरणीचा आधार !
ऊन, पाऊस,वा-याशी सतत यांचा झगडा
त्यावर मात करुनी हाकावा आयुष्याचा गाडा!
काटयाकुटक्या जाळुनी मांडीयली चूल
बायका भाजती भाकर सांभाळीत मुल !
निरागस पोरं खेळती आजुबाजुला
मातीचा सुगंध अन् दगडधोंडे सोबतीला !
गडी जुंपले यांचे दिवसभर कामाला
कवडीमोल दाम त्यांच्या कष्टाच्या घामाला !
नाही उदयाची चिंता आणि कसला हव्यास
पोटाची खळगी भरणे हाच एक ध्यास !
आज इथे उदया तिथे असे चाले वारंवार
जसे विंचवाचे बि-हाड त्याच्या पाठीवर !
कष्टमय जीवन तरी हे बिनधास्त
सदाच तयार करावयास परिस्थितीशी दोन हात!
असे कितीतरी जीव आजही उघडयावर
इमल्यांची ना पडे त्यावर नजर !
इमल्यांची ना पडे त्यावर नजर !!
महेश भा. रायखेलकर
वर आकाशाचे छत, खाली धरणीचा आधार !
ऊन, पाऊस,वा-याशी सतत यांचा झगडा
त्यावर मात करुनी हाकावा आयुष्याचा गाडा!
काटयाकुटक्या जाळुनी मांडीयली चूल
बायका भाजती भाकर सांभाळीत मुल !
निरागस पोरं खेळती आजुबाजुला
मातीचा सुगंध अन् दगडधोंडे सोबतीला !
गडी जुंपले यांचे दिवसभर कामाला
कवडीमोल दाम त्यांच्या कष्टाच्या घामाला !
नाही उदयाची चिंता आणि कसला हव्यास
पोटाची खळगी भरणे हाच एक ध्यास !
आज इथे उदया तिथे असे चाले वारंवार
जसे विंचवाचे बि-हाड त्याच्या पाठीवर !
कष्टमय जीवन तरी हे बिनधास्त
सदाच तयार करावयास परिस्थितीशी दोन हात!
असे कितीतरी जीव आजही उघडयावर
इमल्यांची ना पडे त्यावर नजर !
इमल्यांची ना पडे त्यावर नजर !!

Comments
Post a Comment