हायकू कविता

माणूस कधी
जनावर होतो
माणसाला खातो
************
नको तुलना
इतरांच्या आयुष्याची
खात्री काय त्यांच्या भविष्याची
*******************
दया करा
मुक्या प्राण्यांवर
नका उठू त्यांच्या जीवावर
***********************
गरीब असला
तरी त्यालाही आहे जीव
ठेवावी जाणीव
****************
अपेक्षा ठेवून मदत
करू नका
कर्माची नोंद देवाच्या वहीत
*******************
चांगल्या कर्माचे
फळ चांगलेच मिळते
उशीरा कळते
******************
यशासाठी फार तपश्यर्या
करावी लागते
घाईघाई नडते
*****************
यश म्हणजे
एक प्रवास
नाही होत विनासायास
*****************
जे यशस्वी लोक
नम्र असतात
तेच  भावतात
***************
मोठेपणा मागून
मिळत नाही
लहानपणा येतो धावून
*****************
© महेश भा.  रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog