देवा तुझ्याकडे मागतो एक छोटसं मागणं
कर मला परत एकदा लहान
असेल निर्व्याज, निर्मळ, सुंदर मन
नसेल वासना, असूया, इर्षेची त्यात घाण !
घालेल मी कोणताही पेहराव
फॅशनची नसेल कसलीच हाव
झाली जरी मित्रांसोबत भांडणे आणि कट्टी
थोड्यावेळातच जमून जाईल आमची पुन्हा गट्टी !
नसेल घड्याळ्याच्या काट्यावरची कसरत
खेळत घालवील दिवस रमत-गमत
नसेल कोणतीच माझ्यावर जबाबदारी
आयुष्य असेल ते फारच भारी !
नसेल कोणती चिंता आणि घोर
रंगवेन मी छान चित्रातील मोर
जरी कधी बसलो मी रुसुन
हट्ट पुरवला की बघेन हसून !
नसेल कोणतीच स्पर्धा ही जीवघेणी
नाचत म्हणीन मी बडबड गाणी
सगळं जग वाटेल मला छान-छान
रमून जाईल त्यात माझे बालपण !
सगळेच करतील माझा लाड
लाडाने आई-बाबा म्हणतील आहे मी लबाड
नाही लागणार मला मान आणि सन्मान
माहित नसेल मला काय असतो अपमान !
नसेल जाती-पातीचा मनात विचार
गरीबी-श्रीमंती ना पडणार वागण्यावर असर
दंगा-मस्ती करण्यास मिळाले सवंगडी चार
आनंदाचा सोहळा होईल साकार !
काय कामाचे देवा असले हे मोठेपण
जीव माझा गेला पुरता रे वैतागून
जगावे लागते खोटे मुखवटे घालून
हरवून बसलो त्यातच माझे मीपण !
हरवून बसलो त्यातच माझे मीपण !
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment