तूच, तू

तूच राणी लक्ष्मीबाई तूच जिजाऊ
आहेस कणखर आणि तू लढाऊ

तूच सावित्री, अहिल्या तूच मदर टेरेसा
समास सेवेचा  हाती घेतलास  तू  वसा

तूच  इंदिरा गांधी  आणि  तूच प्रतिभा
तुझ्या कर्तुत्वाचा कळस भिडलाय  आज नभा

तूच गाणकोकिळा, तूच माधुरी
गौरवलीस तू बनुनी जगत सुंदरी

तूच कल्पना चावला, तूच पी.टी उषा
निराश मनात फुलवी तू आशा

तूच आई  आणि   तूच बहीण
तूच कन्या अन तूच सहचारीण

तूच दुर्गा , तूच कुलस्वामिनी
शांत, शीतल प्रसंगी तू दामिनी

तूच सानिया मिर्झा, तूच कोम मेरी
प्रेत्येक क्षेत्रात घेतलीस तू उंच भरारी

तूच किरण बेदी, तूच साईना नेहवाल
तुझ्या मुळे  प्रत्येक घर आनंदी खुशाल

तूच  लक्ष्मी आणि  तूच सरस्वती
युगान,युगे समस्त मानव जात तुज पूजती
 युगान,युगे समस्त मानव जात तुज पूजती


© महेश भा. रायखेलकर




Comments

Popular posts from this blog