मला लागली सरकारी नौकरी
मला लागली आज सरकारी नौकरी
लग्नासाठी मिळून जाईल आता छानशी छोकरी !
शिपायाची जरी असली माझी पोस्ट
कायमची झाली ना राव ही गोष्ट !
कोणी मला सुचवलं मी करावा व्यवसाय
कष्ट करण्याची हो कोठे आपल्याला सवय !
रमत गमत येथे काम मी करीन
अधुनमधून कॅन्टीन मध्ये चहा जावून पिईन !
फार कंटाळा आला तर जाईन रजेवर
नाहीच मंजुर केली तर आहेच मेडीकल !
धंद्यासाठी घ्यावी लागते फार मोठी जोखीम
बापजाद्यांनी आमच्या केली नाही फत्ते ही मोहीम !
आम्ही तरी कसे करावे काही वेगळे धाडस
त्यापेक्षा बरे चिकटलो सरकारी पदास !
काही झाले तरी नोकरी न जाई
म्हणून तर म्हणती आम्हास सरकारचे जावई !
लग्नाच्या बजाराचेही ठावूक मला इंगीत
सरकारी नौकरीने टाकलय सगळ्यांना गुंगीत !
म्हणून सांगतो तुम्हाला ऐका माझे राव
सरकारी नौकरीची सोडू नका तुम्ही हाव !
१० ते ५ असी ड्युटी मी करीन
संध्याकाळी बायको सोबत गप्पा मी मारीन !
सणवार - रविवार असेल मला सुट्टी
कामाची तर आहे कोठे आपली गट्टी !
वरचेवर मिळेल मला महागाई भत्ता
सरकारला देखील टिकवायचीय आपली सत्ता !
नवीन नवीन लागु होतील वेतन आयोग
धंद्यात कोठे हो असला योगायोग !
रिटायर होऊन बांधेन एखादे मी घर
बाहेरचा शिपायी होईल घरचा चाकर !
बाहेरचा शिपायी होईल घरचा चाकर !!
© महेश भा. रायखेलकर
मला लागली आज सरकारी नौकरी
लग्नासाठी मिळून जाईल आता छानशी छोकरी !
शिपायाची जरी असली माझी पोस्ट
कायमची झाली ना राव ही गोष्ट !
कोणी मला सुचवलं मी करावा व्यवसाय
कष्ट करण्याची हो कोठे आपल्याला सवय !
रमत गमत येथे काम मी करीन
अधुनमधून कॅन्टीन मध्ये चहा जावून पिईन !
फार कंटाळा आला तर जाईन रजेवर
नाहीच मंजुर केली तर आहेच मेडीकल !
धंद्यासाठी घ्यावी लागते फार मोठी जोखीम
बापजाद्यांनी आमच्या केली नाही फत्ते ही मोहीम !
आम्ही तरी कसे करावे काही वेगळे धाडस
त्यापेक्षा बरे चिकटलो सरकारी पदास !
काही झाले तरी नोकरी न जाई
म्हणून तर म्हणती आम्हास सरकारचे जावई !
लग्नाच्या बजाराचेही ठावूक मला इंगीत
सरकारी नौकरीने टाकलय सगळ्यांना गुंगीत !
म्हणून सांगतो तुम्हाला ऐका माझे राव
सरकारी नौकरीची सोडू नका तुम्ही हाव !
१० ते ५ असी ड्युटी मी करीन
संध्याकाळी बायको सोबत गप्पा मी मारीन !
सणवार - रविवार असेल मला सुट्टी
कामाची तर आहे कोठे आपली गट्टी !
वरचेवर मिळेल मला महागाई भत्ता
सरकारला देखील टिकवायचीय आपली सत्ता !
नवीन नवीन लागु होतील वेतन आयोग
धंद्यात कोठे हो असला योगायोग !
रिटायर होऊन बांधेन एखादे मी घर
बाहेरचा शिपायी होईल घरचा चाकर !
बाहेरचा शिपायी होईल घरचा चाकर !!
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment