जन्म घे आई परत फिरुनी 

जन्म घे आई परत फिरुनी
सांभाळीन तुला तुझा बाबा होवुनी

करील मी माया तेवढीच तुझ्यावर
जेवढी कधी केली होतीस तु  माझ्यावर

झोपवॆल तुला मी गाऊन अंगाई
भरवील सुन तुला तुझी बनुन आई

असशील तु  आपल्या घरची राजकुमारी
गोरी, गोरी गोड,गोड जशी आली धरणीवर परी

घेईल हळूच मी तुझ्या गालाचा पापा
मारीन तुझ्यासोबत बोबड्या गप्पा

खेळीन तुझ्या संगे मी लपंडाव
संपला जरी एक सुरु होईल नवीन डाव

नको अशी माझ्यावर रुसु तु गडे
जरी मारली मी  एक टपली तुला लाडे लाडे

ये नको करू आता फार उशीर
तुला भेटण्यास झालो मी अधीर
तुला भेटण्यास झालो मी अधीर

© महेश भा.  रायखेलकर 


Comments

Popular posts from this blog