सैनिकहो तुमच्यासाठी 

देशाच्या सीमेचे करता तुम्ही रक्षण
म्हणुन आम्ही उपभोगु शकतो चार आनंदाचे क्षण !

प्रतिकूल परीस्थितीशी  करता तुम्ही सामना
आहे आदर तुमच्याबद्धल आमचीया  मना !



कुटुंबापासून दूरदेशी असता तुम्ही तैनात
 राहू शकतो आम्ही त्यामुळे मुलाबाळांसोबत घरात, सुखात !

वेळप्रसंगी प्राणाचे करिता तुम्ही बलिदान
यास्तव देशाचे अढळ आहे जगात स्थान !

पराक्रमी आणि आहात तुम्ही शूरवीर
शत्रूची करावी आम्ही कशाला फिकीर !

भारतमाता आहे तुमच्यामुळे सुरक्षित
जन-गण-मनाचे स्थान राहणार अबाधीत !

आहोत आम्ही  पक्के हे जाणून
देश संकटात पडला कि येणार तुम्ही धावून !

आज आम्ही तुम्हाला देतो एक वचन
तुमच्यासम आम्हीही वाढवू देशाची आन- बान - शान  !
तुमच्यासम आम्हीही वाढवू देशाची आन- बान - शान  !!


© महेश भा.  रायखेलकर 





Comments

Popular posts from this blog