सत्कर्माची 'श्रद्धा'
तुम्ही लोकांना संकटात मदत करा,
हजारो हात येतील तुम्हास मदतीस, तुमच्या संकटात !
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !!
तुम्ही लोकांना यशाचा मंत्र शिकवा,
ते करतील तुमच्या यशाची विधात्त्याकडे कामना !
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !!
तुम्ही निराधाराचा व्हा आधार,
जीवनात कधीच होणार नाहीत तुम्ही निराधार !
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !!
तुम्ही भुकेल्याला अन्न द्या,
अन्नदेवता असेल कायमची तुमच्यावर प्रसन्नः !
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !!
तुम्ही दुस-याला आनंद द्या,
दुखा:ची सावली नाही पडणार तुमच्या आयुष्यावर !
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !!
तुम्ही लोकांस मान- सन्मान द्या,
इतरही होतील तुमच्या समोर विनम्र !
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !!
तुम्ही लोकांचा द्वेष करा,
लोक पाहतील तुम्हाला पाण्यात !
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !!
तुम्ही सत्कर्माविषयी बाळगावी श्रद्धा
ईश्वर ही उभा राहील पाठी सदा
दुष्कर्माची होऊ देउ नये बाधा
रहावे डोळस बनुनी न व्हावे अंधा !
रहावे डोळस बनुनी न व्हावे अंधा !!
तुम्ही लोकांना संकटात मदत करा,
हजारो हात येतील तुम्हास मदतीस, तुमच्या संकटात !
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !!
तुम्ही लोकांना यशाचा मंत्र शिकवा,
ते करतील तुमच्या यशाची विधात्त्याकडे कामना !
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !!
तुम्ही निराधाराचा व्हा आधार,
जीवनात कधीच होणार नाहीत तुम्ही निराधार !
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !!
तुम्ही भुकेल्याला अन्न द्या,
अन्नदेवता असेल कायमची तुमच्यावर प्रसन्नः !
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !!
तुम्ही दुस-याला आनंद द्या,
दुखा:ची सावली नाही पडणार तुमच्या आयुष्यावर !
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !!
तुम्ही लोकांस मान- सन्मान द्या,
इतरही होतील तुमच्या समोर विनम्र !
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !!
तुम्ही लोकांचा द्वेष करा,
लोक पाहतील तुम्हाला पाण्यात !
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !!
तुम्ही सत्कर्माविषयी बाळगावी श्रद्धा
ईश्वर ही उभा राहील पाठी सदा
दुष्कर्माची होऊ देउ नये बाधा
रहावे डोळस बनुनी न व्हावे अंधा !
रहावे डोळस बनुनी न व्हावे अंधा !!
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment