मित्र /मैत्री 

प्रसंगी धावून येईल तो खरा मित्र
पार्ट्या झोडायला जमेल कोणीही पुत्र
अपयशामध्ये धीर देईल तो खरा सखा
यशाचा वाटेकरी बनेल कोणीही परका !

जीवाला जीव देईल ती खरी फ्रेन्डशिप
कोणीही जमतील गप्पा मारायला चिप
दुःखाचे अश्रू  पुसेल तो खरा सोबती
आनंदाचा बनेल कोणीही  सभापती !

खांद्याला  खांदा  देवून लढेल तो खरा सवंगडी
नुसतेच खेळायला येईल कोणताही गडी
अडचणीत मदत करेल ती खरी मैत्री
तयार कोणीही खिशाला लावायला कात्री !

धरती वरचे सर्वात नाते हे सुंदर
जसे भगवंताने गुंफले पवित्र मंदीर
मैत्री म्हणजे  देवाचे अनमोल वरदान
टिकून राहावी  जोपर्यंत कुटीत आहेत  प्राण !
टिकून राहावी जोपर्यंत कुटीत आहेत प्राण !!

© महेश भा. रायखेलकर



Comments

Popular posts from this blog