आले आले गणपती आले
आले आले गणपती आले
घर आनंदाने न्हाहून निघाले !
आले आले गणपती आले
आले आले गणपती आले
लहान- थोर बेभान नाचू लागले !
आले आले गणपती आले
आले आले गणपती आले
शंकर- पार्वतीस कैलासी करमेनासे झाले !
आले आले गणपती आले
आले आले गणपती आले
उंदीर मामाचे महत्वं वाढियले !
आले आले गणपती आले
आले आले गणपती आले
मोदकांचा नैवद्य, पंचआरतीने ओवाळिले !
आले आले गणपती आले
आले आले गणपती आले
दुर्वा वाहून त्यास गुलाल उधळिले !
आले आले गणपती आले
आले आले गणपती आले
गौराईचे उमटती त्यासोबत पाऊले !
आले आले गणपती आले
आले आले गणपती आले
चहूकडील वातावरण गणेशमय झाले !
आले आले गणपती आले
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment