बंम्प्या



मला वाटे दिवसभर मस्त मित्रासोबत खेळावे
अधूनमधून टीव्ही वर कार्टून पहावे
कशाला हवी ही परिक्षा बिरिक्षा
लहान पणीच आम्हालाच केवढी मोठी ही शिक्षा

पाठीवरी माझ्या दप्तराचे ओझे
जरी झाले ते मला नकोसे
क्लास मध्ये टीचर बोलती इंग्रजी फाड फाड
मला मात्र वाटे सर्वच जड जड
वीक मध्ये दोन दिवस   हॉलीडे
होमवर्क चा तर रोजचाच डे
 स्प्लेल्लिंग टेबल घेती आई घोकून  घोकून
जरी गेलो मी पुरता थकून

स्कुल मध्ये अधे मधे वेगवेगळे कॉम्पिटिशन
माझे असते त्यात पार्टीशिपेशन
आई बाबांना व्हावे वाटे मी स्मार्ट
यासाठी सर्व क्लास्सेस आहेत स्टार्ट
        
आई माझे पुरवी सर्वच लाड
बाबा म्हणती त्या मुळे होईल मी म्याड
आबांशी माझी चांगलीच गट्टी
सांगतात  रोज ते  नविन  छान छान गोष्टी

नवीन नवीन गिफ्ट  असे  मला हवे
मधे  मधे  आईसक्रीम वाटे खावे
कधी कधी खावी गाडीवर भेळपुरी
नाहीतर आई ने करावी घरीच पाणीपुरी

बाबा आहेत माझे कडक कडक
बोलतात ते रागाने भडक भडक
तरी मी त्यांचा चुकुवून नेम 
खेळतो त्यांच्या मोबाईल वरील गेम 

आई बाबा दोन्ही जाती कामाला 
वाट पाहुनी जीव माझा दमला 
मला वाटे दोघांनी घरीच रहावे 
दिवसभर मी त्यांच्या सोबत हुंडदावे  
दिवसभर मी त्यांच्या सोबत हुंडदावे  !!


  © महेश भा. रायखेलकर 









Comments

Popular posts from this blog