नोटबंदी
५०० - १००० च्या नोटा गेल्या चलनातून बाहेर
काळा- पैसा वाला कापे भीतीने थरथर
सामान्य जनता आहे जाम खुशीत
तयार ताटकळत थांबायला रांगेत !
नोटबंदीने दहशदवाद्याचे मोडले कंबरडे
जाली नोट छापणारा धाय मोकलून रडे
अवैध संपत्ती आणि ज्यांनी भरला नाही कर
त्यांचा मागे लागला चांगलाच घोर !
कष्टाची ज्यांची आहे कमाई
नाही त्यांना कसलीच चिंता आणि घाई
तो करतो नोटबंदीचे स्वागत
रात्री शांत झोपतो गाणे गुणगुणत !
काळ्याचे पांढरे करण्याची चालू धावपळ
कोणी देतो कमीशन कोणी घालतो गळ
भ्रष्ट्राचाराची धेंडे आहेत ही चोर
नुकसान देशाचे केले यांनी फार !
विरोधक म्हणती ही आहे सावर्जनिक लूट
नियोजनाची म्हणे लागली पुरती वाट
तेव्हा राधा-सुता कोठे गेला होता तुझा धर्म
घोट्याळ्यांचे जेंव्हा घडले तुमच्याहातूनच कर्म !
सत्ताधा-यांनीही न जावे जास्त शेफारून
देश पुढे न्यावा सर्वांनां सोबत घेऊन
न वाजवावी सतत स्वतःचीच टिमकी
जनता सुज्ञ जाणायला काय जमा काय बाकी !
घडून येत आहे हि अर्थक्रांती
देशाची होईल यातून प्रगती
सहन करूया थोडी कळ आणि त्रास
स्वछ भारत देण्यास पुढच्या पिढीस !
स्वछ भारत देण्यास पुढच्या पिढीस !!
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment