नको उद्या
फुलायचं आहे फुलून घे
झुलायचं आहे झुलून घे
जे करायचं ते आजचं करून घे
नको उद्या, उद्या, उद्या
नाचायचं आहे नाचून घे
गायचं आहे गाऊन घे
जे करायचं ते आजचं करून घे
नको उद्या, उद्या, उद्या
भिजायचं आहे भिजून घे
फिरायचं आहे फिरून घे
जे करायचं ते आजचं करून घे
नको उद्या, उद्या, उद्या
भेटायच आहे भेटून घे
बोलायचं आहे बोलून घे
जे करायचं ते आजचं करून घे
नको उद्या, उद्या, उद्या
खायचं आहे खाऊन घे
प्यायचं आहे पिऊन घे
जे करायचं ते आजचं करून घे
नको उद्या, उद्या, उद्या
रुसायचं आहे रुसून घे
जे करायचं ते आजचं करून घे
नको उद्या, उद्या, उद्या
माहित नाही पुढचा क्षण आहे का नाही
आत्ताचा क्षण आपला, बाकी हाती काही नाही
म्हणून जे करायचं ते आजचं करून घे
नको उद्या, उद्या, उद्या
नको उद्या, उद्या, उद्या
© महेश भा. रायखेलकर
© महेश भा. रायखेलकर

छान आहे ब्लोग .
ReplyDelete