"अनोखा वाढदिवस"


कथा :- अनोखा वाढदिवस
  

अहो आज ऑफीस मधुन लवकर यायचं लक्षात आहेत ना? ” पल्लवी ने गिरीषला विचारलेअगं हो बार्इ आज ओम चा वाढदिवस आहे हे माझ्या चांगलं लक्षात आहेगिरीषने सांगीतले.  “नाही मार्च एन्ड आहे, कामाच्या गडबडीत विसरून जाल म्हणून सांगीतले” “मी करेक्ट सात वाजता हजर आहे, चल बाय मी आता निघतो”.  गिरीष सोलापूर येथे सी..ची प्रॅक्टिस  करत होता तर पल्लवी स्टेट बॅकेत प्रोबेशनरी ऑफीसर म्हणून काम पाहात होती.  ओम हा त्यांचा एकूलता एक वर्षाचा मुलगा जवळच्याच एका इंग्रजी शाळेत   री मध्ये शिकत होतागिरीष पल्लवी देाघेही बाहेर कामानिमीत्त व्यस्त असल्याकारणाने ओमला सांभाळण्याची जबाबदारी ओमच्या आजोबा आजींकडे होतीघरात इतर कामासाठी बार्इ होतीचओम शाळेतुन आल्यानंतर त्याला खायला देणे, त्याच्यावर लक्ष ठेवणे त्याला छान छान गोष्टी सांगणे ही कामे ओमचे आजी आजोबा आनंदाने पार पाडत असतओम या दोघांचा जीव की प्राण होता.  ओमला देखील त्यांचा चांगलाच लळा होताओम या सर्वांचा  लाडका असला तरी त्याच्या वर चांगले संस्कार होतील याची पल्लवी गिरीष कटाक्षाने काळजी घेत असत
ओमच्या बंगल्याजवळच शांताबार्इ एका पत्राच्या खोलीत रहात होत्याशांताबार्इ ला राजु नावाचा ओमच्याच वयाचा एक मुलगा होताशांताबार्इचा नवरा बुधाराम राजु वर्षाचा असतानाच एका दुर्धर आजाराने वारला होताचार घरची कामे करून गुजराण करत ती राजुला शिकवत होतीराजु अतीशय चुणचुणीत मुलगा होताशिकुन राजुला मोठा ऑफीसर बनवायचं हे शांताबार्इचे स्वप्न होतेतो चित्र ही चांगले काढत असेपल्लवी शांताबार्इला काहीवेळेस घरातील अतीरीक्त कामासाठी बोलावुन घ्यायचीकधी कधी राजु देखील तिच्या सोबत यायचाशांताबार्इ गरीब असली तरी कष्टाळु   प्रामाणिक होतीपल्लवीचा तीने विश्वास संपादन केला होताओम राजु एकाच वयाचे असल्याकारणाने त्यांची लवकरच गट्टी जमली.  ओम राजु शाळा सुटल्यावर बंगल्याच्या आवारात खेळत असत.  या आठवडयातच  गुरूवारी ओमचा दहावा वाढदिवस होतामार्च एन्ड असल्याने  गिरीष पल्लवी हे देाघेही कामामध्ये अतीशय व्यस्त होतीदोघांनाही त्या दिवशी सुट्टी  घेणे शक्य नव्हतेओमचा दहावा वाढदिवस असल्याकारणाने सुट्टी नसली तरी संध्याकाळी  तो जोरात साजरा करावयाचा असे दोघांनीही अधीच ठरवले होतेयासाठी त्यांनी आपल्या जवळ च्या मित्रांना नातेवार्इकांना ओमच्या वाढदिवसानिमीत्त पार्टीसाठी आमंत्रीत केलेपल्लवीने शांताबार्इला अगोदरच बोलावुन काही कामांची जबाबदारी सांगीतली.  “आर्इ तु चॉकलेट च्या केकची ऑर्डर  दिलीस ना? “ ओम ने पल्लवीला विचारले. “हो रे माझ्या सोन्यापल्लवीने ओमला जवळ  घेत सांगीतले
ओम ला चॉकलेट केक अतिशय आवडत होतापल्लवीने तिच्या बॅंकेजवळ  असलेल्या प्रसिध्दहॅपी  केकया शॉपी मध्ये अगोदरच केकची ऑर्डर  दिली होतीआज वाढदिवस असल्याकारणाने ओम नवीन ड्रेस  घालुन शाळेत  गेलाचार वाजता शाळेतुन  घरी आल्यानंतर त्याने बघीतले की शांताबार्इ राजु त्याच्या घरी आले आहेत.  “राजु तु आज संध्याकाळी  माझ्या बर्थ डे पार्टीला येओम ने राजुला सांगीतलेराजुहोम्हणालाशांतामावशी तु पण ये ओम शांताबार्इ कडे पाहात म्हणाला". “अरे मीतर पार्टीसंपेपर्यंत येथेच आहेशांतामावशीने काम करता करता सांगीतले.  “आजी मी राजुसोबत येथेच खेळतो तुला टीव्ही पाहायचा असेतर तु पहाओम ने आजीला सांगीतले.  खेळता खेळता ओम ने राजुला विचारलेअरे राजु तुझा बर्थ डे कधी असतो?” शांताबार्इ तेथेच साफ साफ सफार्इ करत होती ती म्हणालीआजच राजुचा देखील वाढदिवस आहे.  “ “अरे व्वा आजच! मजाच की!!” ओम आनंदाने ओरडला. ओम म्हणालाये राजु मग तु देखील संध्याकाळी  केक कापणार असशील?“ “नाहीराजु हिरमुसुन खाली मान घालुन म्हणाला.“बरं तु संध्याकाळी मात्र माझ्याकडे नक्की ये”.  हे सर्व संभाषण शांताबार्इ दुरून ऐकत होती .राजु चा वाढदिवस असुन देखील आपण त्याचे आपल्या गरीब परीस्थितीमुळे काहीही लाड करू शकत नाही हे समजुन ती अतीशय दु:खी झाली.  तुकेक कापणार का ?” हे ओम चे वाक्य ऐकुन त्यावर हिरमुसलेल्या चेहरानेनाही!” म्हणताना राजुला पाहुन ती अधीकच कष्टी झालीओमने आर्इच्या मोबार्इलवर फोन लावलाआर्इ मी ओम बोलतोय ”, “बोल बेटापल्लवी म्हणालीआर्इ तु येतांना  एक नाही दोन दोन चॉकलेट  केक नक्की आणपल्लवीला कामाच्या गडबडीत ओम दोन केक आणायला का सांगतोय हे लक्षात आले  नाही.  तीने गडबडीतहो नक्की बेटा चल मी कामात आहे ठेवतेम्हणुन फोन ठेवला. ऑफीस  मधुन निघतांना तीहॅपी  केकठिकाणी  अधी ऑर्डर  दिलेला केक घेण्यासाठी आली.  केक घेतांना ओम चे दोन केक आणण्याचे बोलणे तिला आठवले.  हा दोन केक का मागतोय? हे तिला आताही समजले नाही.  चॉकलेट केक ओम चा फेव्हरेट केक आहे मागच्या वाढदिवसाला सगळ्यांना  दिल्या नंतर ओमला थोडाच केक राहिला असल्याने तो रूसुन बसला होता हे तिला इतक्यात आठवले.  या वेळेस  परत तसेच व्हायला नको म्हणुन ओम दोन केक मागत असेल हे समजुन ती मनातल्या मनात हसली.  आजतरी ओमला नाराज करायला नको हे समजुन तीनेअजुन असाच एक केक आहे का ?’ असे दुकानदारास विचारलेसुदैवाने तो होताती दोनही केक घेवुन घराकडे निघाली.  सांगीतल्या प्रमाणे दोन केक आणलेले पाहुन ओम आंनदाने उडया मारेल हे समजुन ती सुखावलीपल्लवीला गेटमधुन येतांना पाहुन ओम धावतच तिच्या जवळ  आलातिला बिलगुन त्याने लगेच तीला विचारलेआर्इ तु दोन केक आणलेस ना?” “हो रे माझ्या राज्या” “ ,या !!!” ओम आनंदाने उडया मारत ओरडला.  थोडयाच वेळात गिरीष देखील आला.  “बाबा आर्इने माझ्यासाठी दोन केक आणले आहेतओम म्हणाला. “आरे व्वा, मज्जाच आहे तुझीगिरीष मिस्कील  हसत म्हणाला.  एव्हाना शांताबार्इ घरातल्या कामवाली बायकांना  मदत करत सर्व पार्टीची तयारी करून राजुसह तिच्या घरीसंध्याकाळी  येतोअसे आजी आजोबांना सांगुन गेली होतीपल्लवी गिरीष ने ओम ला तयार केले.  संध्याकाळचे .३०  वाजले.  
हळुहळु  गिरीष पल्लवीचे मित्र मंडळी  यायला सुरवात झाली.  ते दोघे या सर्वाचे हसत मुखाने स्वागत करत होते.  ओम ला सर्वजणहॅपी  बर्थ डेवीश करत गीफ्ट  देत होती ओम त्यांना हसुनथँक्यू  “म्हणत होतासर्वांची वाट पाहुन वाजता केक कापावयाचा असे गिरीष पल्लवीने ठरवलेजवळपास सर्व मित्रमंडळी  जवळचे नातेवार्इक ओमचे काही मित्र जमलेएव्हाना शांताबाई   देखील कामासाठी आली. राजु  दिसत नाही हे पाहुन ओम ने विचारलेशांतामावशी राजु आला नाही ?“ “आरे तो तुला काही तरी दयायला घेवुन  येतो म्हणाला, मी पुढे आलेशांताबार्इ म्हणाली.  “ठीकयओम म्हणाला. घडाळ्यात  आठ वाजले.  पल्लवीने केक सजवलेल्या टेबलावर आणुन ठेवला.  सर्वजण त्या टेबलाभोवती जमा झाली.  “ओम चल केक कापुपल्लवीने ओमला सांगीतले. “आर्इ जरा थांबओम गेट कडे पाहात म्हणाला.  “अरे ओम तु कुणाची वाट पाहात आहेस?” ओम च्या आजीने विचारलेराजु अजुन आला नाही, तो आल्या शिवाय मी केक कापणार नाही. ” ओम म्हणाला.  ओमला राजु गेट पाशी  उभा राहिलेला दिसलाआतली सर्व मोठी चांगल्या कपडयातली माणसे पाहुन राजु आत यायला बिचकत होतात्याच्या अंगावर साधाच ड्रेस  होता.  त्याच्या हातात त्याने स्वत:च्या हाताने ओम देण्यासाठी काढलेले एक चित्र होते.  राजुला पाहिल्यानंतर ओम त्याच्या जवळ गेलाराजु ने ते चित्र ओमला दिले हॅपी  बर्थ डेम्हणाला.  चित्र पाहुन ओम आनंदाने उदगारालावा छान चित्र आहेथँक्यूओमने राजुचा हात धरत त्याला आपल्याजवळ  बसवलेओमने राजुला आपल्या जवळ  बसवले हे पाहुन गिरीषच्या कपाळावर रागाने आढी पडली.  ओम पल्लवीला म्हणालाआर्इ आज राजुचा देखील वाढदिवस आहे “ “हॅपी  बर्थ डे राजु”.  “आर्इ तो  दुसरा केक आण, मी राजु एकदम केक कापणार आहोत. ” एव्हाना पल्लवी गिरीषला ओम देान केक मागण्यामागचे कारण समजले.  पल्लवीने दुसरा केक आणलाचल राजु तु मी देाघेही केक कापुओम राजु कडे पाहात म्हणालाओम ने राजुने दोघांनीही केक कापले.  सर्वानीहॅपी  बर्थडे ओम अँण्ड  राजुअशी घोषणा दिली.  राजु पहिल्यांदाच त्याचा वाढदिवसाचा केक कापत होता.  तो खुप आनंदीत झालापल्लवीला आपल्या ओमचे मित्रप्रेम पाहुन कौतुक वाटले.  गिरीषला आपल्या मुलाचा अभिमान वाटला.  ओमचे आजी आजोबातर नातवाचे हे वर्तन पाहुन खुष झाली.  शांताबार्इच्या डोळ्यात  हे सर्व  पाहुन पाणी आलेओमने तिच्या राजुचा आज एक अनोखा वाढदिवस साजरा केला.  अशाप्रकारे ओमने लहानवयातच माणुसकीचे मित्रप्रेमाचे  दर्शन घडवत अनोखा वाढदिवस साजरा केला




Comments

Popular posts from this blog