प्रेम- स्वप्न  

वाचावे स्वप्न तुझे मी 
पाहावे त्यात मला मी 
बोलावे वा-या संगे 
तू माझी सांगावे मी 


व्हावे माझे स्वप्न पुरे 
तू माझी राणी व्हावे 
जे माझे ते केव्हाही 
दोघांचे बनुन रहावे 

कोणाला का भ्यावे मी 
तू जेव्हा माझ्यापाशी 
येथे  तू मी सौख्याने 
नांदावे  पिल्लापाशी 

केव्हा हे सारे व्हावे 
प्रेमाने  विजयी  व्हावे  
माझ्या  प्रेमाचे गाव  न  ते    
नुसत्या  स्वप्नातच  रहावे  

© महेश भा. रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog