अंधश्रद्धा

मांजर आडवे गेले कि म्हणे काम होत नाही !
काय तुझ्या कर्तृत्वावर तुझा विश्वास नाही !!

मुलगा म्हणे असतो वंशाचा दिवा !
मुलीनेच  दोन कुळाचा उद्धार करावा !!

गणपती विसर्जन नद्या,तलावातच करणार !
पर्यावरणाचा बरे कोण विचार करणार   !!

म्हणे तिच्या-त्याच्या  अंगात देवी येते !
खरे तर मानसीक आजाराने तो-ती पीडित असते !!

नवस-सायासाने म्हणे मुले होतात !
वैद्यकीय उपचार काय बिनकामाचे असतात !!

देवी-देवतांसमोर पशु-पक्षांचा बळी दिला जातो !
आपल्याच निर्मितीचा बळी घेऊन देव कसा खुष होतो !!

विधवा महिला म्हणे अपशकुनी असते !
नव-याचे मरण काय तिच्या हातात असते !!

अमावस्येचा दिवस म्हणे चांगला नसतो 
जीवनातील प्रत्येक दिवस सुंदरच असतो !!

सोडा सकळ- जनहो सोडा  अंधश्रद्धा !
विज्ञान, श्रम,  कर्तृत्वावर ठेवा तुम्ही श्रद्धा !!!

महेश भालचंद्रराव  रायखेलकर
"गंगा-स्मृती", घर नंबर १, रोहिणी नगर नंबर १ , 
सैफुल, विजापूर रोड , सोलापूर 
मोबाईल : ९३२६६१२४३६





Comments

Popular posts from this blog