तेव्हा  मी   X   आता  मी

मला पाहिजे होती दिक्षितांची माधुरी,
राहिली ती  कहाणी माझी अधुरी !
ऐश्वर्या ची देखिल होती मला आशा,
तिने देखिल केली माझी घोर  निराशा !

मी होतो तेव्हा रजनीकांत,
आता नुसताच मी शांत शांत !
मी होतो तेव्हा  शाहरुख,
आता नुसतीच मनात रुख रुख !

मी राखत होतो तेव्हा हिप्पी,
अर्ध्या डोक्याची झाली आता माझ्या  चंपी !
तेव्हा चाले मी फार  ऐटीत,
आता बसतो गुडघे  मी  टेकित !

तेव्हा होतो एकटा मी  सदाशिव,
आता बायको खाई  माझा जीव !
तेव्हा पाहत होतो सदाच मी  सिनेमे,
आता पाहतो घरातली मी  कामे !

तेव्हा होतो ऎन मी जवानीत,
आता बसे काकाच्या मी  पंक्तीत !
तेव्हा चाले माझाच  करिश्मा,
आता डोळ्याला लागलाय माझ्या  चष्मा !

तेव्हा नसे खर्चाचा माझा  ताळेबंद,
आता हिशोबाचा जडलाय मला  छंद !
तेव्हा होतो अगदी मी सडपातळ,
आता पोटाची सुटलीय माझ्या आयाळ

तेव्हा फिरे मी अगदी मोकाट,
आता काम मोडी माझे  पेकाट !
तेव्हा  येई माझ्या स्वप्नात राणी,
आता झोपतो  मी भरुनी  घरचे  पाणी !

तेव्हा गाई मी  प्रेमाची मधुर गाणी,
आता धावतोय मी  कमवायला नाणी !
तेव्हा  सारी दुनिया वाटे प्यारी प्यारी,
आता झालो मी पक्का संसारी !
आता झालो मी पक्का संसारी !!

महेश भा.  रायखेलकर 




Comments

Popular posts from this blog