काही हायकू
न सांगताही
काही करावे
मन ओळखावे
***********
मी तर म्हणतो
सांगून टाक
कशाचा धाक
************
उगाच कोणाला
त्रास देवू नये
सज्जनाचा मामला
**************
घडयाळाच्या तालावर
मी नाचतो
वेळ सतावतो
****************
उगाच गुळमुळीत
बोलू नकोस
करेल घात
****************
विचार करून
शिणलो फार
झोपतो गार
***************
कमावता एक
खाणारे दहा
फजिती पहा
***************
कोणाच्या चेष्टेचा
विषय बनू नये
न व्हावे चमचा
****************
तुझं घर
ते माझं घर
सासर माहेर
****************
तूला रडतांना
पाहू शकत नाही
पाहिलंय हसतांना
****************
© महेश भा. रायखेलकर
न सांगताही
काही करावे
मन ओळखावे
***********
मी तर म्हणतो
सांगून टाक
कशाचा धाक
************
उगाच कोणाला
त्रास देवू नये
सज्जनाचा मामला
**************
घडयाळाच्या तालावर
मी नाचतो
वेळ सतावतो
****************
उगाच गुळमुळीत
बोलू नकोस
करेल घात
****************
विचार करून
शिणलो फार
झोपतो गार
***************
कमावता एक
खाणारे दहा
फजिती पहा
***************
कोणाच्या चेष्टेचा
विषय बनू नये
न व्हावे चमचा
****************
तुझं घर
ते माझं घर
सासर माहेर
****************
तूला रडतांना
पाहू शकत नाही
पाहिलंय हसतांना
****************
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment