आपलं काय ?

छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्वराज्याची स्थापना केली
आपलं काय ?
गांधीजींनी सत्याचा आग्रह धरून
अहिंसा धर्म अवघ्या जगात पोहचवला
आपलं काय ?
नेताजी सुभाष चंद्र  बोस यांनी
आझाद हिंद सेनेची स्थापना करून
इंग्रज राजवटीला सळो कि पळो करून सोडले
आपलं काय ?
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हसत हसत
स्वातंत्र्यासाठी फासावर गेले
आपलं काय ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण केली 
देशाला राज्यघटना लिहून दिली 
आपलं काय ?
महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी
मोलाचे योगदान दिले
आपलं काय ?
डॉ. अब्दुल कलाम यांनी
देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न दिले
आपलं काय ?
बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी
आपले आयुष्य वेचले .
आपलं काय ?
या आणी अश्या असंख्य महान व्यक्तीनी
देशाच्या स्वातंत्र्यासाठी व देश स्वतंत्र्य झाल्यानंतर
देशासाठी आपले आयुष्य खर्चीले
आपलं काय ?
आपलेही नाव वरील यादीत येवू शकेल
जर देशासाठी काही विधायक करून दाखवले तर
नाहीतर देशाच्या १२५ करोड जनते मध्ये आपण एक
जगलो काय आणि मेलो काय !
जगलो काय आणि मेलो काय !!

महेश भा. रायखेलकर



Comments

Popular posts from this blog