त्याने मला मान दिला नाही
असं म्हणू नको रे
तू मोठा हो रे !तू मोठा हो रे !
याने मला विचारले नाही
त्याने मला विचारले नाही
असं म्हणत बसू नको रे
तू मोठा हो रे !तू मोठा हो रे !
याने माझा अपमान केला
त्याने माझा अपमान केला
असं सांगू नको रे
तू मोठा हो रे !तू मोठा हो रे !
याने माझी विचारपूस केली नाही
त्याने माझी विचारपूस केली नाही
असं काय म्हणतोस रे
तू मोठा हो रे !तू मोठा हो रे !
याने माझा सत्कार केला नाही
त्याने माझा सत्कार केला नाही
असं काय सांगतोस रे
तू मोठा हो रे !तू मोठा हो रे !
याने मला निमंत्रण दिले नाही
त्याने मला आमंत्रण दिले नाही
असं काय करतोस रे
तू मोठा हो रे !तू मोठा हो रे !
याने माझी आठवण काढली नाही
त्याने माझी आठवण काढली नाही
असा सूर लावू नको रे
तू मोठा हो रे !तू मोठा हो रे !
मान, अपमान
आनंद, दुःख
याच्या पलीकडचा तू विचार कर रे
तू मोठा हो रे !
तू मोठा हो रे !!
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment