"अविस्मरणीय सूत्रसंचालन"
 

 


ज्यांना अनेक कार्यक्रमात ऐकलेलं आहे, ज्यांचे साहित्य वाचलेले आहे अशा  सोलापुरातील जेष्ठ कवी साहित्यिक नुसते सोलापूर नाही तर महाराष्ट्राला परिचित असलेले सोलापुराचे  साहित्यभूषण आदरणीय श्री. माधव पवार यांच्या अध्येक्षतेखाली व उर्दु बरोबर  मराठी साहित्याचा गाढा अभ्यास असणाऱ्या  जेष्ठ साहित्यिका डॉ. नसीम पठाण यांच्या प्रमुख अतिथी मध्ये व सोलापूर साहित्यामधील सर्व दिग्ग्ज जेष्ठ कवी, साहित्यिक  सर्वश्री  मारुती काटकधोंड , गिरीश दुनाखे , राजेंद्र भोसले , रेणुका बुधाराम , पदमाकर कुलकर्णी , वैशाली अघोर , रामचंद्र धर्मसाले , रमेश  खाडे यांच्या प्रमुख  उपस्थितीत  पार पडलेल्या  काव्यप्रेमी शिक्षक  मंचच्या १२ वा  राज्यस्तरीय काव्यमहोत्सवातील सोलापूर शहर व जिल्ह्यातील कवी साठी आयोजित केलेल्या ' कविता सोलापुरी ' या सत्राचे सूत्रसंचालनाची जबाबदारी मंचाने माझ्याकडे सोपवली होती. एवढ्या थोर व जेष्ठ साहित्यिकांसमोर  सूत्रसंचालन  करणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते पण मंचाने जबाबदारी सोपवल्यानंतर मागे राहणे मला शक्य नव्हते. कार्यक्रमाच्या अगोदर घरी काय बोलायचे आहे याची व या सर्व साहित्यिक लोकांची थोडी माहिती कागदावर लिहून काढली . थोडा काय बोलायचे याचा अभ्यास केला . याच कार्यक्रमात या जेष्ठ कवींचे कवितेचे सादरीकरण देखील होणार होते तेव्हा आपण जास्त न बोलता त्यांना कविता सादर करण्यासाठी जास्त वेळ द्यायचा असे मी अगोदरच ठरवले होते . माझ्या मते सूत्रसंचालकाने कमी बोलत कार्यक्रम हा पुढे न्यायचा असतो . काही कार्यक्रमात सूत्रसंचालकच एवढा बोलतो कि कार्यक्रम रटाळ होऊन जातो . मला हे टाळायचे होते . सर्व जेष्ठ कवींनी आपल्या सर्वोत्तम रचना सादर केल्या . रसिक सोलापूरकर त्यांच्या सादरीकरणावर अगदी खूष झाले . त्यामुळे माझा भार थोडा हलका झाला.  शेवटी डॉ. नसीम पठाण यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला . या सूत्रसंचालन  अनुभवाने माझ्यातील सूत्रसंचालनाचा आत्मविस्वास वाढला जो कि पुढेही मला कामी आला .  शेवटी  माझ्यासाठी  आत्तापर्यतच्या  सूत्रसंचालनामधील  हे  एक अविस्मरणीय  सूत्रसंचालन ठरले  . 


Comments

Popular posts from this blog