"आत्मविश्वास यशाचा पहिला मंत्र"




या या गोष्टी मी करू शकतो याबद्धलचा विश्वास म्हणजे आत्मविश्वास. काही लोकांमध्ये हा जन्मतः असतो तर काही लोकांना तो आत्मसात करावा लागतो. आता तो आत्मसात करायचा म्हणजे नेमके काय करायचे तर ज्या कामाची आपल्याला भीती वाटते ते काम करून टाकायचे. काम केल्याशिवाय ते आपल्याला जमेल का नाही हे कसे समजणार. ते करण्याचा  विश्वास कसा निर्माण होणार. कोणतेही नवीन काम करतांना पहिल्यांदा भीती वाटणे हे मानवी स्वभावाला धरून आहे परंतु आपण भीतीपोटी ते काम केलेच नाही तर भीती न्यूनगंडात कधी परावर्तित होईल हे आपल्याला समजणार सुद्धा नाही. जे काम करावयाचे आहे त्याची सर्व माहिती घ्या, सराव हवा असेल तर तो देखील करा. भीती हि अनाठायी आहे हे लक्षात घ्या. 
आत्मविश्वास हा तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. न्यूनगंडाने पछाडलेला माणूस काहीही करू शकत नाही. जेवढी जास्त कामे तुम्ही कराल, जेवढ्या जास्त लोकांच्या तुम्ही संपर्कात याल, जेवढ्या नवीन नवीन संधी तुम्ही साध्य कराल, जेवढ्या जास्त  अडचणीला तुम्ही तोंड द्याल तेवढा आत्मविश्वास तुमचा वाढेल. तेव्हा या सर्व गोष्टी करण्यासाठी सदैव सज्ज राहा. जे काही माहित नाही ते शिकून घ्या. नवीन तंत्रज्ञान अवगत करा. एखादा चांगला मार्गदर्शक जीवनात ठेवा. रोज मी नवीन काही तरी शिकेल हा मंत्र जपा . त्याच त्याच चुका परत परत करू नका. अनुभवातून शिकत चला. मदत घ्या व मदत करा. यशस्वी लोकांच्या संगतीत राहा. चांगली पुस्तके वाचा. निसर्गाकडून शिका . माणसाला अशक्य आहे अशी कोणतीही गोष्ट नाही. आजची जी काही आजूबाजूला प्रगती आपण झालेली पाहतो त्या प्रगतीमागे मानवी हातच आहे हे ओळखा . जे जे शक्य आहे ते सर्व करा. शरीर व मन दोन्हीही मजबूत करा. व्यसनाच्या मागे चुकूनही लागू नका . योग्य आहार, पुरेशी विश्रांती तुमचा आत्मविश्वास वाढवेल . चांगला पेहराव , स्वच्छता , टापटीपपणा  , चांगल्या सवई , वाईट सवईचा त्याग या सर्व गोष्टी  आत्मविश्वास वाढीस पूरक आहेत .   अपयश येईल म्हणून मी कामच करणार नाही असे धोरण ठेऊ नका. जीवनाला आत्मविश्वासाने सामोरे जा यश तुमचेच आहे. 

Comments

Popular posts from this blog