"भारत विचार मंच" 




लेखनाच्या माध्यमातून   मी सामाजीक प्रश्न मांडण्याचे  प्रयत्न केले . तसेच व्यवसाया सोबत सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन आमच्या  संस्थेच्या वर्धापन दिन ( व्यंकटेशा कॉम्पुटेक) एक सामाजिक उपक्रम राबवून आम्ही साजरा करतो  .  एवढ्या पुरते  मर्यादित न राहता, , स्वातंत्र्य दिनाच्या शुभ- मुहूर्तावर (१५/०८/२०१८)   एका सामाजिक मंचाचा शुभारंभ   करून सामाजिक कार्याचा  परीघ    वाढवला तो मंच म्हणजे भारत विचार मंच.  याचे ब्रीद ठेवले    'मी फक्त भारतीय  भारत माझा विचार' आणि प्रतिज्ञा ठरवली जी आपण सर्व शाळेतून वर्षानुवर्षे म्हणतो ती म्हणजे भारत माझा देश आहे. याची उद्दिष्टे खालील प्रमाणे ठरवली 

१. "मी फक्त भारतीय, भारत माझा विचार! " हे ब्रीद जन-मानसात रुजविणे
२. गायन, काव्य, लेखन, नाटय  इ. साठी व्यासपीठ निर्माण करणे
३. रक्तदान, अवयवदान(प्रचार) , अन्नदान, वस्त्र दान इ.  घडवून आणणे
४. करीअर,उद्योग,स्पर्धा परीक्षा,व्यक्तीमत्व विकास इ. विषयांवर  मार्गदर्शन शिबीर आयोजीत करणे
५. पर्यावरण पुरक विविध उपक्रम राबविणे (वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, प्लास्टिक बंदी   इ.)
६. विद्यार्थ्यांसाठी  कला व क्रीडा विषयक स्पर्धा आयोजीत करणे
७. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय  काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान  करणे
८. समाजातील वंचीत घटकांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करणे

स्वातंत्र्य दिनाच्या शुभ- मुहूर्तावर (१५/०८/२०१८)  दशमेश हायवे सर्व्हिस  सोलापूर येथे झेंडा वंदन केल्यानंतर तिरंग्याच्या साक्षीने  , नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सोबत काम केलेले जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी व भारतीय सेनेत कॅप्टन पदावर कर्त्तव्य बजावलेले  श्रीमान कॅप्टन  सोहनसिंग सराय यांच्या शुभहस्ते 'भारत विचार मंच' चे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी कॅप्टन  सोहनसिंग सराय यांचा शाल व पुष्पगुच्छ  देवून सत्कार करण्यात आला. तसेच दशमेश हायवे सर्व्हिस च्या संचालिका सराय भगिनी  यांचा देखील पुष्पगुच्छ  देवून सत्कार करण्यात आला. एका जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी व सैनिकाचे आशिर्वाद आम्हाला या प्रसंगी लाभले.  समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय  काम केलेल्या व्यक्तींचा सत्कार करणे या अंतर्गत ३००० ब्लॉग लिहिणा-या व ज्यास गुगल ने स्वखर्चाने अमिरिकेत सत्कारासाठी  निमंत्रण दिले आहे  अश्या ओंकार जंजीराल याचा सत्कार भारत विचार मंच तर्फे करण्यात आला. बिकट परिस्थितीमध्ये त्याने मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.  दिवाळी आनंदाचा सण, प्रकाशाचा सण. परंतु आपल्याच काही बांधवांपर्यंत हा आनंद, प्रकाश जाऊं शकत नाही.  आपली हि जबाबदारी आहे कि तो आनंद, प्रकाश त्यांच्यापर्यंत घेऊन जाणे. हाच विचार लक्षात  घेऊन  भारत विचार मंच तर्फे दि. ०५.११.२०१८ (सोमवार) रोजी रेवणसिद्वेश्वर मंदिर रोड येथील मूर्तीकार बांधवांसाठी फराळ वाटप उपक्रम  केला गेला  [पुढे    "रक्तदान-श्रेष्ठ दान"  १०.०३. २०१९ (रविवार) रोजी डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले  गेले २७ फेब्रुवारी 'मराठी राजभाषा दिनाचे' औचित्य साधून 'वाचन चळवळ' वृद्धिगत व्हावी या उद्देशाने  दि. २७,२८,२९ फेब्रुवारी २०२० दरम्यान ' वाचन प्रेरणा महोत्सव' चे आयोजन करण्यात आले . या अंतर्गत वाचकांना उपलब्ध पुस्तकांतून एक पुस्तक घरी वाचनासाठी मोफत मिळणार दिले .ते त्यांनी घेतल्या पासून एक महिन्याच्या आत वाचुन परत करणे अपेक्षित होते .  या पुस्तकात  विवेकानंद, रामदेव बाबा, पु. ल. देशपांडे, कवी संजीव, चंद्रशेखर गोखले, विश्वास नांगरे पाटील, वसंत बापट अशा नामवंत लेखकांनी  लिहलेली नाटक, कविता संग्रह, कादंबरी, विचारधन, चारोळी संग्रह, ललित लेखन, प्रेरणादायी, आरोग्य विषयक  पुस्तकांचा समावेश केला गेला  . त्याच बरोबर या महोत्सवात  भाग घेण्या-या  प्रथम तीन वाचकांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले . नंतर गायक कलाकारांना   एक व्यासपीठ मिळावे या हेतूने व देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी या उद्देशाने  २६ जानेवारी २०२३ रोजी   प्रजासत्ताक दिनानिमित्त   भारत  विचार मंच तर्फे  ऑनलाईन गुगल मीट वर  २६  गायक कलाकारांचा  देशभक्तीपर  गीतांचा " जरा याद करो कुर्बानी " या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भविष्यात देखील या मंचाद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस आहे. 


Comments

Popular posts from this blog