काही हायकू

तू म्हणती माझं बरं
मी म्हणतो तुझं बरं
 कोणाचं खरं
                                                            +++++++++++
उगाच लांबण
लावून बोलु नकोस
थोडक्यात सांग तुझं म्हणणं
++++++++++++++++++

एकदाच केलं
मी प्रेम
तेही फसलं
+++++++++++++++
माझ्या हातात
काही नाही
सगळं तुझ्या होकारात
++++++++++++++++
जीवनात धरसोड
वृत्ती नको
हवी भक्क्म पकड
+++++++++++++++
कोणीच काही
करत नाही
त्यात मीही
++++++++++++++
मन झाले
माझे जड
डोळे ओले
++++++++++++++
घातलेस तू
डोळ्यात काजळ
दिसेना तळ
++++++++++++++
 तू कधी
वेळ सांभाळलीस
मी सदा आधी
++++++++++++++
माझ्या मनाची
आहे तूला जाणीव
नको करू कीव
+++++++++++++

महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog