काही हायकू


एकदा जीवनाची
वाट चुकली
अन फसली
============
सरकार काही
करत नाही
शेतकरी पाही
==============
आज आहे
म्हणे सूर्यग्रहण
त्याचीदेखील ओढाताण
 ===============

सरकारी कामकाजात
दखल नको
जाल आत
==============
तुझ्या गालावरची
खळी अशी खुलते
मन विरघळते
===============
आपल्या माणसाला
काय लाजायच
लाज ठेव बाजूला
==============
एकतर तुला
कोणी विचारत नाही
काळजी मला
=============
मी झालो
फार उतावीळ
नको खीळ
=============
स्वतः खातो
ताजे अन्न
शिळे देतो
=============
सतत मोबाईल
मध्ये  तुझी नजर
जरा पहा वर
==============

महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog