काही हायकू

तुझ्या जीवनातून
झालो मी दूर
काळ झाला क्रूर
************
भूतकाळ जेव्हा
वर्तमानकाळात डोकावतो
 संसार मोडतो
 ***************
रोज चे तेच तेच
का गाता रडगाणे
व्हा शहाणे
************
भूतकाळाचा आढावा  घ्या
वर्तमनात जगा
भविष्यासाठी आळस त्यागा
******************
वेळेला द्या
पैसाएवढेच महत्व
यशस्वी होंण्याचे हेच  तत्व
****************
लोकं काय म्हणतील
याचा विचार करू नका
कालांतराने तेच चांगलं बोलतील
***********************
स्वतः बरोबर
इतरांचाही विचार जो करतो
तोच माणूस असतो
*********************
जाता जात नाही
ती म्हणजे जात
माणुसकीचा घात
*******************

Comments

Popular posts from this blog