माझी माय मराठी
माझी माय मराठी
आहे सौंदर्याची ती खाण
प्रत्येक मराठी माणसास
आहे तिचा गर्व आणि अभिमान
माझी माय मराठी
प्रथम पडले तिचे बोल कानावर
तिच्यासोबत खेळत, बागडत
आला माझ्या जीवनाशी आकार
माझी माय मराठी
भाग्यवान जेव्हा आली ती ओठी
पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा
तिचे बोल बोलण्यासाठी
माझी माय मराठी
आहे आमची ती शान
तिच्या एक एक शब्दास
आहे अमृताचा मान
माझी माय मराठी
लावी आम्हा गोडी अन करी माया
राहूदे अशीच आयुष्यभर
आमच्यावर तिच्या प्रेमाची छाया
माझी माय मराठी
जो पर्यंत आहे आत्मा शरीरात
परत परत लिहीन तिच्या
जय- जयकाराचे मी गीत
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment