जय शिवाजी ! जय शिवाजी !!

थोर पराक्रमी , ध्येयधोरणी !
जय शिवाजी ! जय शिवाजी !!
जिजाऊचा बाळ, शहाजीचां लाल !
जय शिवाजी ! जय शिवाजी !!
भवानी देई तलवार, शत्रूवर करी वार !
जय शिवाजी ! जय शिवाजी !!
स्त्रियांचा आदर, कडेलोट जर आली तक्रार !
जय शिवाजी ! जय शिवाजी !!
अफजलखानाचे फाडे पोट , शाहिस्तेखानाची तोडी बोटं !
जय शिवाजी ! जय शिवाजी !!
स्वराज्याचे बांधी तोरण, रयतॆच्या हिताची राबवी धोरण !
जय शिवाजी ! जय शिवाजी !!
गोब्राह्मण प्रतिपालक, मावळ्यांचा नायक !
जय शिवाजी ! जय शिवाजी !!
श्रीमानयोगी, ज्ञानयोगी !
जय शिवाजी ! जय शिवाजी !!
तानाजी,बाजी सारखे घडवी सरदार !
जय शिवाजी ! जय शिवाजी !!
साक्षात शिव अवतार, प्रजेच्या मनात आदर !
जय शिवाजी ! जय शिवाजी !!
कुलदिपक, खरा लोकनायक !
जय शिवाजी ! जय शिवाजी !!
राजाधिराज, ओरंगजेबाचॆ झुकवे शीष !
जय शिवाजी ! जय शिवाजी!!
हिंदवी स्वराज्य स्थ।पक,मुगलांना बसवे धाक !
 जय शिवाजी ! जय शिवाजी!!
छावाचा पिता, जाणता राजा !
 जय शिवाजी ! जय शिवाजी !!
आमचे दैवत,होऊ नतमस्तक !
जय शिवाजी ! जय शिवाजी!!
जय शिवाजी ! जय शिवाजी!!

© महेश भा.  रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog