काही हायकू

जगात काहीच
नाही शाश्वत
चाललो जमवत
===========
कायदाचा नसे
 बसे धाक
 गुंड निर्धोक
 ===========
झाडे तोडतांना
विचार करा
न थंड वारा
===========
सतत कसला
विचार करतेस
सांग मला
============
संस्कार जाणीवपूर्वक
करावे लागतात
कुसंस्कार चिकटतात
===============
आपल्या माणसांना
वेळ द्या
नको कामाचा बहाणा
==============
नेतेमंडळी येतात
लगेच एकत्र
राजकारणाचे सूत्र
===============
गणित फार
अवघड जाते
डोकं खाते
==============
 उद्याचे काम
आज करा
नको उशीरा
==============
ऐनवेळेस होते
फक्त फजिती
कोण लक्षात ठेवते
==============

महेश भा. रायखेलकर


Comments

Popular posts from this blog