Posts

Showing posts from January, 2024
Image
 "पर्यावरणपूरक उत्सव काळाची गरज" आपला समाज हा उत्सवप्रिय समाज आहे तो वर्षभर अनेक उत्सव साजरे करीत  असतो. रूढी परंपरेने उत्सव साजरे करणे हा त्याचा जगण्याचा अविभाज्य भाग आहे उत्सव त्यास नवीन ऊर्जा, उत्साह देण्याचे काम करीत असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा देणे, आप्त, नातेवाईक, मित्रांची भेट होणे, नवीन वस्त्र , अलंकार, वस्तु खरेदी करणे, मिठाईची देवाणघेवाण करणे हे उत्सवाने माणसास साध्य करता येते.  म्हणून  प्रत्येक माणूस येणा -या उत्सवाची आतुरतेने वाट पाहात असतो. अनेक धर्माचे लोक वर्षभरात  अनेक उत्सव साजरे करीत असतात.  उत्सव साजरे करीत असतांना ते पर्यावरणाला मारक तर ठरीत नाहीत ना? याचा विचार करणे आज गरजेचे झालेले आहे. प्रत्येक उत्सवामुळे पर्यावरणाला धोका नसला तरी काही उत्सव साजरे करतांना, पर्यावरणाची हानी  होते हे लक्षात घेणे गरजेचे आहे . काही उत्सवामूळे ध्वनी प्रदुषण, वायु प्रदुषण जल प्रदुषण होत आहे हे काळाने सिध्द केलेले आहे  तर काही उत्सवामुळे प्राणीमात्राला आपला जीव गमवावा लागतो हे देखील आपण बघतो.  सर्वात मोठा उत्सव 'दिवाळी' . . दिव...
Image
  "स्मार्ट सोलापूरसाठी  नगरसेवक कसा असावा"           देशातील १०० शहरांचा स्मार्ट सिटी करण्याची सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या शहरामध्ये 'सोलापूर' चा समावेश व्हावा ही अतिशय अभिमानाची व आनंदाची बाब आहे . यामूळे सोलापूरचा पूर्णपणे कायापालट होणार आहे. सोलापूरचा ' स्मार्ट सिटी' मध्ये समावेश व्हावा यासाठी महापालिका आयुक्त , महापौर व अधिकारी वर्ग यांनी अतीशय परिश्रम घेतले आहेत . सोलापूरची ' स्मार्ट सिटी'  साठी तर निवड झाली तरी प्रत्यक्ष ती  ' स्मार्ट सिटी'  होण्यासाठी या योजनेवर काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे व या कामी नगरसेवकांनी देखील आपले योगदान देणे अत्यंत आवश्यक आहे. नागरीकांच्या सहकार्याशिवाय  ' स्मार्ट सिटी' चे स्वप्न हे साकार होवू शकणार नाही.           महानरपालिकेत नगरसेवक हा त्या त्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत असतो. महानगरपालिका व नागरीक यातील तो एक दुवा आहे. नगरसेवकाचे घटनेने अनेक अधिकार, जबाबदाऱ्या व कामे ठरवून दिलेली आहेत. घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून...
Image
  " कवी कट्टाच्या माध्यमातून कवितेचा जागर"  काव्यप्रेमी शिक्षक मंच या राज्यव्यापी मंचाचा सोलापूर शहर अध्यक्षाची धुरा माझ्याकडे आल्यानंतर कवितेसाठी एखादा उपक्रम राबवावा जो वर्षभर चालेल असा विचार माझ्या समोर आला आणि मग कवी कट्टा ची कल्पना सुचली. कल्पना सुचल्यानंतर मी ही कल्पना आमचे राज्याध्यक्ष श्री. आनंदजी घोडके यांना ती सांगितली . त्यांनी ही कल्पना लगेच उचलून धरली.  २०२१ या वर्षात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ऑनलाईन पद्धतीने सलग बाराही महिने कवी कट्टा चे आयोजन केले गेले ज्यामुळे राज्यातील कवींना व्यासपीठ मिळून त्यांना आपल्या रचना सादर करण्याची संधी मिळाली. पहिल्या कवी कट्टाचे उदघाटन  काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष  श्री. आनंद घोडके यांच्या हस्ते करण्यात आले तर राज्य सचीव श्री. कालिदास चवडेकर यांचे कवी कट्टाला मार्गदर्शन लाभले. पुढील कवी कट्टाचे    उदघाटन  सर्वश्री नारायण दुमालदार , प्रा. सत्येंद्र राऊत, हणमंत पडवळ, बाबुराव घाडीगावकर ,  पी. नंदकिशोर , संजय कुळये , श्रीमती विजया पाटील , सौ. जस्मिन शेख यांनी केले तर स्व. विज...
Image
"भारत विचार मंच"  लेखनाच्या माध्यमातून   मी सामाजीक प्रश्न मांडण्याचे  प्रयत्न केले . तसेच व्यवसाया सोबत सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन आमच्या  संस्थेच्या वर्धापन दिन ( व्यंकटेशा कॉम्पुटेक) एक सामाजिक उपक्रम राबवून आम्ही साजरा करतो  .  एवढ्या पुरते  मर्यादित न राहता, , स्वातंत्र्य दिनाच्या शुभ- मुहूर्तावर (१५/०८/२०१८)   एका सामाजिक मंचाचा शुभारंभ   करून सामाजिक कार्याचा  परीघ    वाढवला तो मंच म्हणजे भारत विचार मंच.  याचे ब्रीद ठेवले    'मी फक्त भारतीय  भारत माझा विचार' आणि प्रतिज्ञा ठरवली जी आपण सर्व शाळेतून वर्षानुवर्षे म्हणतो ती म्हणजे भारत माझा देश आहे. याची उद्दिष्टे खालील प्रमाणे ठरवली  १. "मी फक्त भारतीय, भारत माझा विचार! " हे ब्रीद जन-मानसात रुजविणे २. गायन, काव्य, लेखन, नाटय  इ. साठी व्यासपीठ निर्माण करणे ३. रक्तदान, अवयवदान(प्रचार) , अन्नदान, वस्त्र दान इ.  घडवून आणणे ४. करीअर,उद्योग,स्पर्धा परीक्षा,व्यक्तीमत्व विकास ...
Image
"दृक्श्राव्य दिवाळी अंक" सन २०२२ च्या दिवाळीला एका अनोख्या दिवाळी अंकात सहभाग घेण्याची संधी मिळाली तो म्हणजे रेणुका आर्टस् प्रस्तुत स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक. हा अंक पाहता येत होता , वाचता येत होता आणि ऐकताही येत होता. आतापर्यंत छापील अनेक दिवाळी अंकात लेख , कविता प्रकाशित झाले होते पण गेल्या वर्षी स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक याच्या संपादिका आसावरी इंगळे मॅडम यांच्या फेसबुकच्या पोस्ट वरून या दिवाळी अंकात सहभाग घेतला. यात माझ्या 'गुणांची उजळणी करूया ' या लेखाचे अभिवाचन ' माणसाच असंच असतं ' या कवितेचे सादरीकरण व 'तुमसे मिलना बाते करना' या गीताचे गायन याचा समावेश होता . संपादिका आसावरी इंगळे मॅडम यांनी सलग तिसऱ्या वर्षी खूप मेहनतीने , कल्पकतेने हा अंक तयार केला होता. तीनही प्रकारात सहभाग घेणारा बहुतेक मी एकटा होतो. हा अंक संपूर्ण जगात पोहचू शकला कारण हा ऑनलाईन होता. मराठी माणूस जगात जेथे कोठे आहे त्याला त्याच्या जागेवरून हा अंक ऑनलाईन पाहणे, ऐकणे आणि वाचणे शक्य होते. तंत्रज्ञानाचा वापर किती चांगल्या रीतीने करता येतो हे या अंकावरून याच्या संपादि...
Image
"अविस्मरणीय सूत्रसंचालन"     ज्यांना अनेक कार्यक्रमात ऐकलेलं आहे, ज्यांचे साहित्य वाचलेले आहे अशा  सोलापुरातील जेष्ठ कवी साहित्यिक नुसते सोलापूर नाही तर महाराष्ट्राला परिचित असलेले सोलापुराचे  साहित्यभूषण आदरणीय श्री. माधव पवार यांच्या अध्येक्षतेखाली व उर्दु बरोबर  मराठी साहित्याचा गाढा अभ्यास असणाऱ्या  जेष्ठ साहित्यिका डॉ. नसीम पठाण यांच्या प्रमुख अतिथी मध्ये व सोलापूर साहित्यामधील सर्व दिग्ग्ज जेष्ठ कवी, साहित्यिक  सर्वश्री  मारुती काटकधोंड , गिरीश दुनाखे , राजेंद्र भोसले , रेणुका बुधाराम , पदमाकर कुलकर्णी , वैशाली अघोर , रामचंद्र धर्मसाले , रमेश  खाडे यांच्या प्रमुख  उपस्थितीत  पार पडलेल्या  काव्यप्रेमी शिक्षक  मंचच्या १२ वा  राज्यस्तरीय काव्यमहोत्सवातील सोलापूर शहर व जिल्ह्यातील कवी साठी आयोजित केलेल्या ' कविता सोलापुरी ' या सत्राचे सूत्रसंचालनाची जबाबदारी मंचाने माझ्याकडे सोपवली होती. एवढ्या थोर व जेष्ठ  साहित्यिकांसमोर    सूत्रसंचालन  करणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते पण मंचाने जबाबद...
Image
  " आत्मविश्वास यशाचा पहिला मंत्र" या या गोष्टी मी करू शकतो याबद्धलचा  विश्वास  म्हणजे  आत्मविश्वास. काही लोकांमध्ये हा जन्मतः असतो तर काही लोकांना तो आत्मसात करावा लागतो. आता तो आत्मसात करायचा म्हणजे नेमके काय करायचे तर ज्या कामाची आपल्याला भीती वाटते ते काम करून टाकायचे. काम केल्याशिवाय ते आपल्याला जमेल का नाही हे कसे समजणार. ते करण्याचा    विश्वास कसा निर्माण होणार. कोणतेही नवीन काम करतांना पहिल्यांदा भीती वाटणे हे मानवी स्वभावाला धरून आहे परंतु आपण भीतीपोटी ते काम केलेच नाही तर भीती न्यूनगंडात कधी परावर्तित होईल हे आपल्याला समजणार सुद्धा नाही. जे काम करावयाचे आहे त्याची सर्व माहिती घ्या, सराव हवा असेल तर तो देखील करा. भीती हि अनाठायी आहे हे लक्षात घ्या.  आत्मविश्वास हा तुम्हाला यशाकडे घेऊन जातो.  न्यूनगंडाने पछाडलेला माणूस काहीही करू शकत नाही. जेवढी जास्त कामे तुम्ही कराल, जेवढ्या जास्त लोकांच्या तुम्ही संपर्कात याल, जेवढ्या नवीन नवीन संधी तुम्ही साध्य कराल, जेवढ्या जास्त  अडचणीला तुम्ही तोंड द्याल तेवढा  आत्मविश्वास  तुमचा वाढे...
Image
' लिहा एक पत्र आईसाठी '     व्हाट्सअँप,  फेसबुक, इन्स्ट्रा ,  ई-मेल  या सारख्या माध्यमामुळे पत्र लिहणे आणि ते पाठविणे हे मागे पडले आहे. नवीन पिढीला पत्रलेखन फक्त अभ्यासक्रमापुरते व परीक्षेतील मार्कापुरते . प्रत्यक्ष अंतर्देशीय  पत्र , पोस्टकार्ड काय असते हे या पिढीला माहित देखील नाही. जागतीक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने श्री. विकास गोसावी सर  यांच्या संस्थेने ' लिहा एक पत्र आईसाठी ' हा विषय घेऊन पत्रलेखनाची संधी तेही आंतर्देशीय पत्रावर या नवीन पिढीला दिली . माझ्या इयत्ता ८ वीतील मुलास पार्थास  आंतर्देशीय पत्र ,   पोस्टकार्ड आणून देऊन कमीत कमी ते कसे असते  व त्यावर कसे लिहायचे हे माहित व्हावे या उद्देशाने भाग घ्यावयास लावला . उद्देश सफल झाला असे म्हणावयास हरकत नाही . आमचे मित्र श्री. अरविंद म्हेत्रे सर यांच्या माझे फेसबुक स्नेही या ग्रुप मुळे  श्री. विकास गोसावी सर  यांच्या या उपक्रमाची माहिती  झाली . या निमित्ताने पत्र लिहण्याचा आनंद त्याला घेता  आला .  नवीन पिढी  अनेक गोष्टील...
Image
 "जुन्या आठवणींना उजाळा "  उस्मानाबादला भाच्याच्या लग्नसोहळा निमित्त गेलो असता मी ज्या  शाळेत ५ वी ते १० शिकलो ती जिल्हा परिषदच्या शाळेला भेट दिली . मी उस्मानाबादला या आधी देखील खूपदा गेलो आहे पण शाळेला भेट देण्याचा कधी योग आला  नव्हता . या शाळेत मी पाच वर्ष शिकलो .  त्याच शाळेला संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या ज्या वर्ग खोलीत ११ वी व १२ वी चे शिक्षण घेतले त्या वर्गखोलीत परत एकदा बसलो. शाळेत असतांना शाळेच्या मैदानावर शाळा सुटल्यानंतर रंगलेला खो खो चा खेळ असो , याच मैदानावर केलेली एन. सी . सी . ची परेड असेल , कॉलेजला असतांना याच मैदानावर मित्रांसोबत मारलेला गप्पा असतील. सारे काही एका क्षणात नजरेसमोर आले . याच वेळी  उस्मानाबादमधील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मी बीकॉम प्रथभ वर्षाचे शिक्षण घेतले त्या महाविद्यालयाला भेट दिली. महाविद्यालयाचे सायकल स्टॅन्ड ज्यात मी सायकल लावत होतो त्यास निरखून पाहिले. स्टेज जिथे महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन होत असे तेही नजरेखालून घातले .   या  सर्व ठिकाणी मी शाळा व महाविद्यालय सोडल्यानंतर प्रथमच गे...
Image
  "उपेक्षित उर्मिला" रामायणात राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान यांना जेवढा मान-सन्मान, गौरव त्यांच्यावर लिखाण, मालिका, चित्रपट जेवढे निघाले तो  मान लक्ष्मण पत्नी उर्मिलाला मिळाला नाही असे मला वाटते. राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान हे चरित्र गौरवास्पद आहेत हे मान्यच त्यात कोणताही वाद असायचे काहीही कारण नाही फक्त उर्मिला हि जरा या मान - सन्मानापासून थोडी उपेक्षितच राहिली असेच म्हणावे लागेल. रामायणातील खलपुरुष रावणाची देखील आठवण काढली जाते पण त्यागमूर्ती उर्मिला कित्येक जणांना माहीतही नाही.  लक्ष्मण पत्नी उर्मिलेचा खूप मोठा त्याग आहे. राजा दशरथाच्या दिलेल्या वचनाला अनुसरून राम जेव्हा वनवासाला निघतात तेव्हा लक्ष्मण देखील रामा सोबत वनवासाला निघतो. जेथे राम तेथे सीता म्हणून सीता देखील रामासोबत वनवास स्वीकारते. राम, सीता, लक्ष्मण वनवासाला जातात. हा काळ थोडा नसून तब्बल चौदा वर्षाचा .  सीतेसोबत तिचा पती राम तरी होता . वनवासातील दुःख, त्रास, कष्ट सोसण्यासाठी ते दोघे एकमेकांच्या सोबत तरी होते पण इकडे अयोध्येत लक्ष्मणाशिवाय म्हणजेच आपल्या पतीशिवाय चौदा वर्ष ऊर्मिलेने काढली. केवढा...