"पर्यावरणपूरक उत्सव काळाची गरज" आपला समाज हा उत्सवप्रिय समाज आहे तो वर्षभर अनेक उत्सव साजरे करीत असतो. रूढी परंपरेने उत्सव साजरे करणे हा त्याचा जगण्याचा अविभाज्य भाग आहे उत्सव त्यास नवीन ऊर्जा, उत्साह देण्याचे काम करीत असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा देणे, आप्त, नातेवाईक, मित्रांची भेट होणे, नवीन वस्त्र , अलंकार, वस्तु खरेदी करणे, मिठाईची देवाणघेवाण करणे हे उत्सवाने माणसास साध्य करता येते. म्हणून प्रत्येक माणूस येणा -या उत्सवाची आतुरतेने वाट पाहात असतो. अनेक धर्माचे लोक वर्षभरात अनेक उत्सव साजरे करीत असतात. उत्सव साजरे करीत असतांना ते पर्यावरणाला मारक तर ठरीत नाहीत ना? याचा विचार करणे आज गरजेचे झालेले आहे. प्रत्येक उत्सवामुळे पर्यावरणाला धोका नसला तरी काही उत्सव साजरे करतांना, पर्यावरणाची हानी होते हे लक्षात घेणे गरजेचे आहे . काही उत्सवामूळे ध्वनी प्रदुषण, वायु प्रदुषण जल प्रदुषण होत आहे हे काळाने सिध्द केलेले आहे तर काही उत्सवामुळे प्राणीमात्राला आपला जीव गमवावा लागतो हे देखील आपण बघतो. सर्वात मोठा उत्सव 'दिवाळी' . . दिव...