Posts

Showing posts from 2019
Image
सरकारनामा पुत्र मोहात पुरतं अडकलं धनुष्य जोर लावतोय सत्तेसाठी पट्टशिष्य लबाड घड्याळ बसलंय संधीसाठी दबून हात देखील करतंय  सोबत हातचं राखून कमळाची चालू चाण्यक नीती मतदार राजाने केली पुरती फजीती देशाचे प्रश्न, खोगर भरती केली  राज्यात त्या पापाचे माप पडले असे पदरात इंजिन सोडतंय उगाच मधेच धूर पतंगाची,  गॅसची नसे काहीच खबर अपक्षांची चालू  नुसती पळापळ सत्त्तेच्या गोठ्यात ठोकण्या तळ राजा करतोय परदेशाची  वारी प्रधानावर त्याची भिस्त सारी नागपूरी रोडकरी करती शिकस्त आपला गावचा माणूस बसण्या खुर्चीत दर पाच वर्षांनी तेच तेच नाटक राज्यशकट हाका  नका करू करमणूक ठेवा लक्षात जायचंय पुन्हा जनतेच्या दारात तुमच्या नाटकाची चीड बसली  त्यांच्या  मनात © महेश भा. रायखेलकर
Image
सांगा कसं वागावं  सांगा कसं वागावं , काहीच कळेना ताठ वागलं तर ताठ आहे म्हणतात नम्र वागलं तर फार सज्जन आहे म्हणतात सांगा कसं वागावं, काहीच कळेना फार बोललं तर बोलघेवडा म्हणतात नाही बोललं तर अबोल आहे म्हणतात सांगा कसं वागावं, काहीच कळेना फार काम केलं तर घाण्याचा बैल म्हणतात नाही केलं तर रिकामटेकडा  म्हणतात सांगा कसं वागावं, काहीच कळेना  पैसा कमवला तर पैश्याच्या पाठीमागे  लागलो म्हणतात नाही कमवला तर कफल्लक आहे  म्हणतात सांगा कसं वागावं, काहीच कळेना देवपुजा केली तर देव देव करतो म्हणतात नाहीच केली तर नास्तिक आहे म्हणतात सांगा कसं वागावं, काहीच कळेना जास्त खर्च केला तर उधळपट्टी करतो म्हणतात नाहीच केला तर साला कंजूष आहे म्हणतात सांगा कसं वागावं, काहीच कळेना एखादा छंद जोपासला तर नादिष्ट आहे म्हणतात नाहीच जोपासला तर काय निरस जगतो म्हणतात सांगा कसं वागावं, काहीच कळेना बायकोचं ऐकलं तर ताटाखालचं मांजर म्हणतात नाही ऐकलं तर आपलंच खरं करतो  म्हणतात सांगा कसं वागावं, काहीच कळेना समाजकार्य केलं तर लष्कराच्या भाकऱ्या भाजतो म्हणतात नाही के...
Image
कोणासाठीतरी...   कोणासाठीतरी थांबणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी चालणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी जगणं ,हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी मरणं ,हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी हसणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी रडणं , हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी बोलणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी रुसणं , हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी बसणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी फिरणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी धरणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी सोडणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी जपणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी थकणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी जोडणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी तोडणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी असणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी नसणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी भेटणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी टाळणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी बनणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी संपणं , हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी झुरणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी झुकणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी भांडणं, हे चांगलं असतं ! कोणासाठीतरी खेळणं , हे चांगलं...
Image
आमचे पप्पा  आमचे पप्पा कै.श्री.  भालचंद्र धोंडोपंत रायखेलकर  एक शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत  व्यक्तीमत्व.  पप्पांची व्यक्तीरेखा, त्यांचा जीवनपट आज त्यांच्या प्रथम मासिक दिवशी मांडतांना  ऊर  भरून येतोय. भावना दाटून आल्यात .आठवणींनी मन  व्यापलय .  त्यांच्या जाण्याने एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.  पप्पा त्यांच्या आई-वडिलाचे एकुलते एक अपत्य. १५ ऑगस्ट १९३८ हा  त्यांचा जन्मदिवस.   तुळजापूर तालुक्यातील रायखेल हे त्यांचे मूळ गाव शिक्षण त्या काळातली मॅट्रिक पर्यंत. लहानपणीचा त्यांच्यातील  व्रात्यपणा पाहून काही काळ त्यांच्या काकांनी (गुंजोटी ता. उमरगा  येथील श्रीकृष्ण संस्थेचे संस्थापक कै. श्री. हरीपंत  रायखेलकर)   त्यांना आपल्याजवळ ठेवून घेतले . काकांचा कडक शिस्तीचा व संस्कारांचा त्यांच्यावर विशेष  प्रभाव होता.  मॅट्रिक नंतर  १९५९ साली वयाच्या २१ व्या वर्षी ते पोलीस खात्यात कॉन्स्टेबल या पदावर  ...
Image
                             कथा :     पेरले ते उगवले                                            शशांक देवधर हे खेम या तालुक्याच्या ठिकाणी ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध होते. सचोटी, प्रामाणिकपणा व योग्य किंमतीत दर्जेदार बांधकाम या कारणामूळे अल्पावधीत त्यांनी शहरात लोकप्रियता व नावलौकीक मिळवला. योग्य किंमतीत उत्कृष्ट घर बांधून मिळणे ही प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाची गरज असते, या कसोटीस शशांक देवधर पूर्णपणे उतरत. खेम हे जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी जिल्हयाच्या ठिकाणापासून अगदी ५० कि.मी. दूर असल्या कारणाने इथली बाजारपेठ चांगली होती. मध्यमवर्गीय व नोकरदार लोकांची संख्या या ठिकाणी जास्त होती. या लोकांना चांगली व योग्य किंमतीत अशी घरे बांधून देण्याचा ध्यास शशांक देवधर यांचा होता. यासाठी ते आपले या क्षेत्रातील ज्ञान, अनुभव व व्यावसायिक कुशलता यांचा मेळ घालत.      ...
Image
गजल वृत्त - मंदाकिनी   (गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा) तू सांग वेडे  काय आहे  तुज मनी  आता तरी  ना प्रेम माझे पोरके  व्हावे  जनीं आता तरी  केल्यास तू वेडया  अती खोटया लढाया या जगी  खोटयास नाही मोल घे तू जाणुनी आता तरी  बा विठ्ठला सोडव तुझ्या भक्तास या जाचातुनी  त्यांच्या  अश्रूंचा, वेदनेचा हो  धनी आता तरी सारे ठरावे  पावसा  का रे तुझ्या येण्यापरी  घे धाव, ये उमदा  असा तू  बरसुनी आता तरी झालास तू रे  फार मोठा माणसा आता जरी मागे वळूनी  तू पहा   त्या  पाय-या आता तरी  ©   महेश भा. रायखेलकर 
Image
गजल वृत्त : वियदगंगा... ( लगागागा लगागागा लगागागा लगागागा)  तुला मी सांगतो  तू अप्सरा  माझीच   आताही  तुझ्यासाठीच   होतो  जीव कासावीस  आताही  मला जाणीव आहे  आपल्या   श्रीमंत  प्रेमाची  तुझा तो त्याग केलेला मला अनमोल  आताही                     कितीदा   वादळा संगे  लढुनी  प्रेम जिंकावे  तुला आणी मला त्या  भावनेचे मोल आताही                  कधी प्रेमात दोघे भांडलो  लाडात त्या वेळी  मला  आणी तुला  त्या नाटकाची  ओढ आताही तुला माहीत आहे मी तुझ्या साथीस  केव्हाही  मला माहीत आहे तूच  माझा जीव   आताही ©  महेश भा. रायखेलकर
Image
गजल वृत्त  : वियदगंगा... ( लगागागा लगागागा लगागागा लगागागा)   मला काही कळेना,  तू   अशी भीतेस कोणाला  तुझा मी श्वास आहे, रोज   सांगावेस कोणाला      जगावे ते तुझ्यासाठी मरावे ते   तुझ्यासाठी  मला सोडून का  तू  गोड   बोलावेस  कोणाला         कधीही कोणताही कायदा मी मोडला नाही   कशाला तू  तरी वर्दीतल्या भ्यांवेस  कोणाला   अरे बाबा कधीही तूच आखावेस  भाग्याला   कशाला   कुंडली दोषास  भेटावेस  कोणाला    तुला जे पाहिजे  देवास मागावेस केव्हाही    उगाची  तू कशाला सांग  पूजावेस कोणाला        © महेश भा. रायखेलकर 
Image
गजल वृत्त:  भुजंग प्रयात     (लगागा लगागा लगागा लगागा)  तुम्हाला कुठे काय आहे कशाचे  कधीही कुठेही इशारे स्वतःचे  ख-याने  कशाला करावी गुलामी   तयाला असावे पुकारे सुखाचे  नशीला तुझा तो इशारा कळाला  तुलाही मलाही कळाले मनाचे  कशाला करावी फुशारी उगाची  असावे कशाला मिरवणे फुकाचे  मलाही कळेना तुलाही कळेना  अघोरी कशाला पहारे  जगाचे  ©  महेश भा. रायखेलकर
Image
गजल वृत्त: भुजंगप्रयात (लगागा लगागा लगागा लगागा)  उगाची स्वतःला  खणावे  कशाला  सदाची  नको ते  बुलावे   कशाला  गरीबी  कधीही पुसावी श्रमाने  श्रमाने  कधीही थकावे  कशाला  जराही  तुला ना  कधी रागवावे  उपाशी कधी तू  निजावे   कशाला  न केली  कधीही ख-याशी लबाडी  तरीही यशाने रुसावे कशाला  कधीही झुकावे यशाच्या समोरी   यशाने फ़ुलूनी फुगावे कशाला  © महेश भा. रायखेलकर 
Image
  टेन्शन पोरगं शिकेल का याचं टेन्शन नोकरी त्याला लागेल का याचं टेन्शन कशा कशा बाबा घ्यावं रे टेन्शन डोकं थकून गेलंय  मागतंय पेन्शन धंदा चालेल का याच टेन्शन बंदा मिळेल का याचं  टेन्शन कशा कशा बाबा घ्यावं रे टेन्शन डोकं थकून गेलंय मागतंय पेन्शन घर होईल का याचं टेन्शन दारी   चारचाकी येईल का याचं  टेन्शन कशा कशा बाबा घ्यावं रे टेन्शन डोकं थकून गेलंय  मागतंय पेन्शन श्रीमंत कधी होणार याचं टेन्शन पैसा कोठे गुंतवावा याचं   टेन्शन कशा कशा बाबा घ्यावं रे टेन्शन डोकं थकून गेलंय मागतंय पेन्शन तब्येत चांगली राहील का याचं टेन्शन लोक काय म्हणतील याच सुद्धा  टेन्शन कशा कशा बाबा घ्यावं रे टेन्शन डोकं थकून गेलंय  मागतंय पेन्शन  जन्मापासून मरेपर्यंत टेन्शन याचं  टेन्शन त्याचं टेन्शन कशा कशाचे घ्यावे सांगा  टेन्शन डोकं थकून गेलंय  मागतंय पेन्शन  डोकं थकून गेलंय ...
Image
शेअर स्वतःचा वाढदिवस केला  शेअर बायकोचा वाढदिवस, तो  देखील केला  शेअर सगळंच कस मला  शेअर करायचंय खाजगी असं काही नाहीच  ठेवायचंय ट्रिप ला गेलो ते केलं शेअर मंदिरात गेलो ते देखील  केलं शेअर सगळंच कस मला  शेअर करायचंय खाजगी असं काही नाहीच  ठेवायचंय हॉटेलात गेलो ते केलं शेअर सिनेमाला गेलो ते सुद्धा केलं शेअर सगळंच कस मला  शेअर करायचंय खाजगी असं काही नाहीच  ठेवायचंय आजारी पडलो ते केलं शेअर खरेदी केली काही,  ते  पण केलं शेअर सगळंच कस मला  शेअर करायचंय खाजगी असं काही नाहीच  ठेवायचंय कोणाची भेट घेतली ते केलं शेअर काही दान केलं, ते देखील  केलं शेअर सगळंच कस मला  शेअर करायचंय खाजगी असं काही नाहीच  ठेवायचंय लग्नाला गेलो ते केलं शेअर शेताला गेलो, केले ते देखील शेअर सगळंच कस मला  शेअर करायचंय खाजगी असं काही नाहीच  ठेवायचंय काही कमावलं ते केलं शेअर काही गमावलं, ते देखील केलं शेअर सगळंच कस मला  शेअर करायचंय खाजगी असं काही नाहीच...