गजल वृत्त: भुजंग प्रयात
(लगागा लगागा लगागा लगागा)
तुम्हाला कुठे काय आहे कशाचे
कधीही कुठेही इशारे स्वतःचे
ख-याने कशाला करावी गुलामी
तयाला असावे पुकारे सुखाचे
नशीला तुझा तो इशारा कळाला
तुलाही मलाही कळाले मनाचे
कशाला करावी फुशारी उगाची
असावे कशाला मिरवणे फुकाचे
मलाही कळेना तुलाही कळेना
अघोरी कशाला पहारे जगाचे
© महेश भा. रायखेलकर
(लगागा लगागा लगागा लगागा)
तुम्हाला कुठे काय आहे कशाचे
कधीही कुठेही इशारे स्वतःचे
ख-याने कशाला करावी गुलामी
तयाला असावे पुकारे सुखाचे
नशीला तुझा तो इशारा कळाला
तुलाही मलाही कळाले मनाचे
कशाला करावी फुशारी उगाची
असावे कशाला मिरवणे फुकाचे
मलाही कळेना तुलाही कळेना
अघोरी कशाला पहारे जगाचे
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment