गजल वृत्त: भुजंगप्रयात
(लगागा लगागा लगागा लगागा)
उगाची स्वतःला खणावे कशाला
सदाची नको ते बुलावे कशाला
गरीबी कधीही पुसावी श्रमाने
श्रमाने कधीही थकावे कशाला
जराही तुला ना कधी रागवावे
उपाशी कधी तू निजावे कशाला
न केली कधीही ख-याशी लबाडी
तरीही यशाने रुसावे कशाला
कधीही झुकावे यशाच्या समोरी
यशाने फ़ुलूनी फुगावे कशाला
(लगागा लगागा लगागा लगागा)
उगाची स्वतःला खणावे कशाला
सदाची नको ते बुलावे कशाला
गरीबी कधीही पुसावी श्रमाने
श्रमाने कधीही थकावे कशाला
जराही तुला ना कधी रागवावे
उपाशी कधी तू निजावे कशाला
न केली कधीही ख-याशी लबाडी
तरीही यशाने रुसावे कशाला
कधीही झुकावे यशाच्या समोरी
यशाने फ़ुलूनी फुगावे कशाला
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment