टेन्शन
पोरगं शिकेल का याचं टेन्शन
नोकरी त्याला लागेल का याचं टेन्शन
कशा कशा बाबा घ्यावं रे टेन्शन
डोकं थकून गेलंय मागतंय पेन्शन
धंदा चालेल का याच टेन्शन
बंदा मिळेल का याचं टेन्शन
कशा कशा बाबा घ्यावं रे टेन्शन
डोकं थकून गेलंय मागतंय पेन्शन
घर होईल का याचं टेन्शन
दारी चारचाकी येईल का याचं टेन्शन
कशा कशा बाबा घ्यावं रे टेन्शन
डोकं थकून गेलंय मागतंय पेन्शन
श्रीमंत कधी होणार याचं टेन्शन
पैसा कोठे गुंतवावा याचं टेन्शन
कशा कशा बाबा घ्यावं रे टेन्शन
डोकं थकून गेलंय मागतंय पेन्शन
तब्येत चांगली राहील का याचं टेन्शन
लोक काय म्हणतील याच सुद्धा टेन्शन
कशा कशा बाबा घ्यावं रे टेन्शन
डोकं थकून गेलंय मागतंय पेन्शन
डोकं थकून गेलंय मागतंय पेन्शन
जन्मापासून मरेपर्यंत टेन्शन
याचं टेन्शन त्याचं टेन्शन
कशा कशाचे घ्यावे सांगा टेन्शन
डोकं थकून गेलंय मागतंय पेन्शन
कशा कशाचे घ्यावे सांगा टेन्शन
डोकं थकून गेलंय मागतंय पेन्शन
डोकं थकून गेलंय मागतंय पेन्शन
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment