सांगा कसं वागावं
सांगा कसं वागावं , काहीच कळेना
ताठ वागलं तर ताठ आहे म्हणतात
नम्र वागलं तर फार सज्जन आहे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
फार बोललं तर बोलघेवडा म्हणतात
नाही बोललं तर अबोल आहे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
फार काम केलं तर घाण्याचा बैल म्हणतात
नाही केलं तर रिकामटेकडा म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
पैसा कमवला तर पैश्याच्या पाठीमागे लागलो म्हणतात
नाही कमवला तर कफल्लक आहे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
देवपुजा केली तर देव देव करतो म्हणतात
नाहीच केली तर नास्तिक आहे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
जास्त खर्च केला तर उधळपट्टी करतो म्हणतात
नाहीच केला तर साला कंजूष आहे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
एखादा छंद जोपासला तर नादिष्ट आहे म्हणतात
नाहीच जोपासला तर काय निरस जगतो म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
बायकोचं ऐकलं तर ताटाखालचं मांजर म्हणतात
नाही ऐकलं तर आपलंच खरं करतो म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
समाजकार्य केलं तर लष्कराच्या भाकऱ्या भाजतो म्हणतात
नाही केलं तर सामाजीक बांधिलकी नाही म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
घरात राहिलो तर घरकोंबडा म्हणतात
बाहेर हिंडलो तर गावभर हिंडतो म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
दादागिरी केली तर गुंड आहे म्हणतात
गरीब वागलो तर भेकड आहे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
रितीरिवाज पाळले तर कर्मठ म्हणतात
नाही पाळले तर मॉडर्न झालो म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
माणसांत मिसळलं तर माणसाळलेला म्हणतात
नाही मिसळलं तर माणूसघाणा म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
थोडं मिरवलं तर चमकोगिरी करतो म्हणतात
नाही केली मागे मागेच राहतो म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
एखादं व्यसन केलं तर व्यसनी आहे म्हणतात
नाही केलं तर जगून काय केलं म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
छान छान राहिला लागलो कि सुधारलास म्हणतात
गबाळ राहिलो तर सुधर बे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
चेष्टा केली तर चेष्टेखोर म्हणतात
नाही केली तर गभीर राहतो म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
सरळ वागलं तर भोळा आहे म्हणतात
वाकडं वागलं तर चालू आहे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
हसलो तर फार हसतो म्हणतात
नाही हसलो तर जरा हसत जा म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
चिंता केली तर चिंतातूर म्हणतात
नाही केली तर बेफिकीर म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
मजा केली तर मजा आहे म्हणतात
नाही केली तर जरा मजा करत जा म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
असं वागलं तर तसं म्हणतात
तसं वागलं तर असं म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना, काहीच कळेना
© महेश भा. रायखेलकर
सांगा कसं वागावं , काहीच कळेना
ताठ वागलं तर ताठ आहे म्हणतात
नम्र वागलं तर फार सज्जन आहे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
फार बोललं तर बोलघेवडा म्हणतात
नाही बोललं तर अबोल आहे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
फार काम केलं तर घाण्याचा बैल म्हणतात
नाही केलं तर रिकामटेकडा म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
पैसा कमवला तर पैश्याच्या पाठीमागे लागलो म्हणतात
नाही कमवला तर कफल्लक आहे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
देवपुजा केली तर देव देव करतो म्हणतात
नाहीच केली तर नास्तिक आहे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
जास्त खर्च केला तर उधळपट्टी करतो म्हणतात
नाहीच केला तर साला कंजूष आहे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
एखादा छंद जोपासला तर नादिष्ट आहे म्हणतात
नाहीच जोपासला तर काय निरस जगतो म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
बायकोचं ऐकलं तर ताटाखालचं मांजर म्हणतात
नाही ऐकलं तर आपलंच खरं करतो म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
समाजकार्य केलं तर लष्कराच्या भाकऱ्या भाजतो म्हणतात
नाही केलं तर सामाजीक बांधिलकी नाही म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
घरात राहिलो तर घरकोंबडा म्हणतात
बाहेर हिंडलो तर गावभर हिंडतो म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
दादागिरी केली तर गुंड आहे म्हणतात
गरीब वागलो तर भेकड आहे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
रितीरिवाज पाळले तर कर्मठ म्हणतात
नाही पाळले तर मॉडर्न झालो म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
माणसांत मिसळलं तर माणसाळलेला म्हणतात
नाही मिसळलं तर माणूसघाणा म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
थोडं मिरवलं तर चमकोगिरी करतो म्हणतात
नाही केली मागे मागेच राहतो म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
एखादं व्यसन केलं तर व्यसनी आहे म्हणतात
नाही केलं तर जगून काय केलं म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
छान छान राहिला लागलो कि सुधारलास म्हणतात
गबाळ राहिलो तर सुधर बे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
चेष्टा केली तर चेष्टेखोर म्हणतात
नाही केली तर गभीर राहतो म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
सरळ वागलं तर भोळा आहे म्हणतात
वाकडं वागलं तर चालू आहे म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
हसलो तर फार हसतो म्हणतात
नाही हसलो तर जरा हसत जा म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
चिंता केली तर चिंतातूर म्हणतात
नाही केली तर बेफिकीर म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
मजा केली तर मजा आहे म्हणतात
नाही केली तर जरा मजा करत जा म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना
असं वागलं तर तसं म्हणतात
तसं वागलं तर असं म्हणतात
सांगा कसं वागावं, काहीच कळेना, काहीच कळेना
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment