सरकारनामा
पुत्र मोहात पुरतं अडकलं धनुष्य
जोर लावतोय सत्तेसाठी पट्टशिष्य
लबाड घड्याळ बसलंय संधीसाठी दबून
हात देखील करतंय सोबत हातचं राखून
कमळाची चालू चाण्यक नीती
मतदार राजाने केली पुरती फजीती
देशाचे प्रश्न, खोगर भरती केली राज्यात
त्या पापाचे माप पडले असे पदरात
इंजिन सोडतंय उगाच मधेच धूर
पतंगाची, गॅसची नसे काहीच खबर
अपक्षांची चालू नुसती पळापळ
सत्त्तेच्या गोठ्यात ठोकण्या तळ
राजा करतोय परदेशाची वारी
प्रधानावर त्याची भिस्त सारी
नागपूरी रोडकरी करती शिकस्त
आपला गावचा माणूस बसण्या खुर्चीत
दर पाच वर्षांनी तेच तेच नाटक
राज्यशकट हाका नका करू करमणूक
ठेवा लक्षात जायचंय पुन्हा जनतेच्या दारात
तुमच्या नाटकाची चीड बसली त्यांच्या मनात
©महेश भा. रायखेलकर
पुत्र मोहात पुरतं अडकलं धनुष्य
जोर लावतोय सत्तेसाठी पट्टशिष्य
लबाड घड्याळ बसलंय संधीसाठी दबून
हात देखील करतंय सोबत हातचं राखून
कमळाची चालू चाण्यक नीती
मतदार राजाने केली पुरती फजीती
देशाचे प्रश्न, खोगर भरती केली राज्यात
त्या पापाचे माप पडले असे पदरात
इंजिन सोडतंय उगाच मधेच धूर
पतंगाची, गॅसची नसे काहीच खबर
अपक्षांची चालू नुसती पळापळ
सत्त्तेच्या गोठ्यात ठोकण्या तळ
प्रधानावर त्याची भिस्त सारी
नागपूरी रोडकरी करती शिकस्त
आपला गावचा माणूस बसण्या खुर्चीत
दर पाच वर्षांनी तेच तेच नाटक
राज्यशकट हाका नका करू करमणूक
ठेवा लक्षात जायचंय पुन्हा जनतेच्या दारात
तुमच्या नाटकाची चीड बसली त्यांच्या मनात
©महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment