गजल वृत्त - मंदाकिनी  

(गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा)
तू सांग वेडे  काय आहे  तुज मनी  आता तरी 
ना प्रेम माझे पोरके  व्हावे  जनीं आता तरी 

केल्यास तू वेडया  अती खोटया लढाया या जगी 
खोटयास नाही मोल घे तू जाणुनी आता तरी 

बा विठ्ठला सोडव तुझ्या भक्तास या जाचातुनी 
त्यांच्या  अश्रूंचा, वेदनेचा हो  धनी आता तरी

सारे ठरावे  पावसा  का रे तुझ्या येण्यापरी 
घे धाव, ये उमदा  असा तू  बरसुनी आता तरी

झालास तू रे  फार मोठा माणसा आता जरी
मागे वळूनी  तू पहा  त्या पाय-या आता तरी 

© महेश भा. रायखेलकर 



Comments

Popular posts from this blog