गजल वृत्त : वियदगंगा...

( लगागागा लगागागा लगागागा लगागागा)
 तुला मी सांगतो  तू अप्सरा  माझीच   आताही
 तुझ्यासाठीच   होतो  जीव कासावीस  आताही

 मला जाणीव आहे  आपल्या   श्रीमंत  प्रेमाची
 तुझा तो त्याग केलेला मला अनमोल  आताही
                  
 कितीदा   वादळा संगे  लढुनी  प्रेम जिंकावे
 तुला आणी मला त्या  भावनेचे मोल आताही
               
 कधी प्रेमात दोघे भांडलो  लाडात त्या वेळी
 मला  आणी तुला  त्या नाटकाची  ओढ आताही

तुला माहीत आहे मी तुझ्या साथीस केव्हाही
 मला माहीत आहे तूच  माझा जीव  आताही

© महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog