Posts

Showing posts from 2018
Image
नको उद्या फुलायचं आहे फुलून घे झुलायचं आहे झुलून घे जे करायचं ते आजचं करून घे नको उद्या, उद्या, उद्या नाचायचं आहे नाचून घे गायचं आहे गाऊन घे जे करायचं ते आजचं करून घे नको उद्या, उद्या, उद्या भिजायचं आहे भिजून घे फिरायचं आहे फिरून घे जे करायचं ते आजचं करून घे नको उद्या, उद्या, उद्या भेटायच आहे भेटून घे बोलायचं आहे बोलून घे जे करायचं ते आजचं करून घे नको उद्या, उद्या, उद्या खायचं आहे खाऊन घे प्यायचं आहे पिऊन घे जे करायचं ते आजचं करून घे नको उद्या, उद्या, उद्या भांडायचं आहे भांडून घे रुसायचं आहे रुसून घे जे करायचं ते आजचं करून घे नको उद्या, उद्या, उद्या माहित नाही पुढचा क्षण  आहे का नाही  आत्ताचा क्षण  आपला, बाकी हाती काही नाही  म्हणून  जे करायचं ते आजचं करून घे  नको उद्या, उद्या, उद्या नको उद्या, उद्या, उद्या © महेश भा. रायखेलकर
Image
  एकाकी गेली पिल्ले उडून ती  झालेना  मी   एकाकी  हाताशी नाही कोणी  झाली सर्व वजाबाकी  मी केले रीते सारे  माझ्या संसारासाठी  कोणी नाही बोलाया  आधारा उरली काठी  तेव्हा होते मी त्यांची  माझ्या कुशीत झोपावे     आता त्यांचे विश्व निराळे  माझ्यासाठी का थांबावे   केले ते कोणासाठी  कोणी ना माझ्यापाशी  देती पैसा दागीने  माया ना त्यांच्यापाशी  ©  महेश भा. रायखेलकर 
Image
मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका   लहान मूल म्हणजे  एक कोरी करकरीत पाटी. त्या पाटीवर जसे गिरवाल तसे त्याचे व्यक्तीमत्व घडत जाते, त्याचे आयुष्य बनत जाते. पण  या पाटीवर गिरविण्याची मुख्य भूमिका कोणाची?, तर ती त्याच्या पालकाची म्हणजेच आई वडिलांची, त्यानंतर मग त्याचे  शिक्षक,  मित्र मंडळी व समाजाची. यातील नंतरचे घटक निवडण्यामध्ये व  त्यावर लक्ष ठेवण्यामध्ये पालक आपली    भूमिका  चांगल्या रितीने वठवू शकतात. पण पालकाची भूमिका चुकली तर सारेच चित्र बिघडू शकते. लहान मूल विशेषतः  आईच्या अगदी जवळ असते त्यास योग्य ते संस्कार करणे, चांगले वळण लावणे, शिस्त लावणे हे आई शिवाय चांगल्या रीतीने कोण करू शकेल? मूल शाळेत जायला लागल्या नंतर मात्र ही जबाबदारी आई-वडील दोघांची बनते. ज्या घरात आजी- आजोबा आहेत त्या घरात मुलाच्या  जडणघडणीत त्यांचा  देखील वाटा असतो .  आजी- आजोबा व आई-वडील यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली वाढलेले  मूल  नक्कीच योग्य दिशेने मार्गक्रमण करते . येथे एकत्र कुट...
Image
प्रेम- स्वप्न   वाचावे स्वप्न तुझे मी  पाहावे त्यात मला मी  बोलावे वा-या संगे  तू माझी सांगावे मी  व्हावे माझे  स्वप्न पुरे  तू माझी राणी  व्हावे   जे माझे ते केव्हाही  दोघांचे बनुन रहावे  कोणाला का भ्यावे मी  तू जेव्हा माझ्यापाशी  येथे  तू मी सौख्याने  नांदावे  पिल्लापाशी  केव्हा हे सारे व्हावे  प्रेमाने  विजयी  व्हावे   माझ्या  प्रेमाचे गाव  न  ते     नुसत्या  स्वप्नातच  रहावे   ©  महेश भा. रायखेलकर 
Image
काही हायकू न सांगताही काही करावे मन ओळखावे *********** मी तर म्हणतो सांगून टाक कशाचा धाक ************ उगाच कोणाला त्रास देवू नये सज्जनाचा मामला ************** घडयाळाच्या तालावर मी नाचतो वेळ सतावतो **************** उगाच गुळमुळीत बोलू नकोस करेल घात ****************  विचार करून शिणलो फार झोपतो गार *************** कमावता एक खाणारे दहा फजिती पहा *************** कोणाच्या चेष्टेचा विषय बनू नये न व्हावे चमचा **************** तुझं घर ते माझं घर सासर माहेर **************** तूला रडतांना पाहू शकत नाही पाहिलंय  हसतांना **************** ©  महेश भा. रायखेलकर
Image
तू मोठा हो रे  याने मला मान दिला नाही त्याने मला मान दिला नाही असं म्हणू नको रे तू मोठा हो रे !तू मोठा हो रे ! याने मला विचारले नाही त्याने मला विचारले नाही असं म्हणत बसू नको रे तू मोठा हो रे !तू मोठा हो रे ! याने माझा अपमान केला त्याने माझा अपमान केला असं सांगू नको रे तू मोठा हो रे !तू मोठा हो रे ! याने माझी विचारपूस केली नाही त्याने माझी विचारपूस केली नाही असं काय म्हणतोस रे तू मोठा हो रे !तू मोठा हो रे ! याने माझा सत्कार केला नाही त्याने माझा सत्कार केला नाही असं काय सांगतोस रे तू मोठा हो रे !तू मोठा हो रे ! याने मला निमंत्रण दिले नाही त्याने मला आमंत्रण दिले नाही असं काय करतोस रे तू मोठा हो रे !तू मोठा हो रे ! याने माझी आठवण काढली नाही त्याने माझी आठवण काढली नाही असा सूर लावू नको रे तू मोठा हो रे !तू मोठा हो रे ! मान, अपमान आनंद, दुःख याच्या पलीकडचा तू  विचार कर  रे तू मोठा हो रे ! तू मोठा हो रे !! © महेश भा. रायखेलकर 
Image
आपलं काय ? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आपलं काय ? गांधीजींनी सत्याचा आग्रह धरून अहिंसा धर्म अवघ्या जगात पोहचवला आपलं काय ? नेताजी सुभाष चंद्र  बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून इंग्रज राजवटीला सळो कि पळो करून सोडले आपलं काय ? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हसत हसत स्वातंत्र्यासाठी फासावर गेले आपलं काय ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  अस्पृश्यता निवारण केली  देशाला राज्यघटना लिहून दिली  आपलं काय ? महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिले आपलं काय ? डॉ. अब्दुल कलाम यांनी देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न दिले आपलं काय ? बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी आपले आयुष्य वेचले . आपलं काय ? या आणी अश्या असंख्य महान व्यक्तीनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी व देश स्वतंत्र्य झाल्यानंतर देशासाठी आपले आयुष्य खर्चीले आपलं काय ? आपलेही नाव वरील यादीत येवू शकेल जर देशासाठी काही विधायक करून दाखवले तर नाहीतर देशाच्या १२५ करोड जनते मध्ये आपण एक जगलो काय आणि मेलो काय ! जगलो काय आणि मेलो काय !! महेश भा. रायखेलकर

"अनोखा वाढदिवस"

Image
कथा :- अनोखा वाढदिवस    “ अहो आज ऑफीस मधुन लवकर यायचं लक्षात आहेत ना ? ” पल्लवी ने गिरीषला विचारले “ अगं हो बार्इ आज ओम चा वाढदिवस आहे हे माझ्या चांगलं लक्षात आहे ” गिरीषने सांगीतले .  “ नाही मार्च एन्ड आहे , कामाच्या गडबडीत विसरून जाल म्हणून सांगीतले ” “ मी करेक्ट सात वाजता हजर आहे , चल बाय मी आता निघतो ”.  गिरीष सोलापूर येथे सी . ए . ची प्रॅक्टिस    करत होता तर पल्लवी स्टेट बॅकेत प्रोबेशनरी   ऑफीसर म्हणून काम   पाहात होती .   ओम हा त्यांचा एकूलता एक ९ वर्षाचा मुलगा जवळच्याच एका इंग्रजी शाळेत    ३   री मध्ये शिकत होता .  गिरीष व पल्लवी देाघेही   बाहेर कामानिमीत्त व्यस्त असल्याकारणाने ओमला सांभाळण्याची जबाबदारी ओमच्या आजोबा आजींकडे होती .  घरात इतर कामासाठी बार्इ होतीच .  ओम शाळेतुन आल्यानंतर त्याला खायला देणे , त्याच्यावर लक्ष ठेवणे व त्याला छान छान गोष्टी सांगणे ही कामे ओमचे आजी व आजोब...