Posts

Showing posts from 2023
Image
                                            नियोजनाचे महत्व समजून घेऊया एका प्रसिद्ध विनोदी लेखकाचे एक वाक्य आहे "ऐन वेळेस होण्यासारखी एकच गोष्ट ती म्हणजे फजिती". या वाक्यातून नियोजनाचे महत्व  अधोरेखीत होते. नियोजन नसेल तर तारांबळ, फजिती, कामात चुका , ताणतणाव अशा गोष्टींना सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. विद्यार्थी लोकांना अभ्यासाचे नियोजन करावे लागेल . गृहिणीला आपल्या घरातील दैनंदिन कामाचे   नियोजन करावे लागेल. नोकरदाराला आपल्या नोकरीतील कामाचे नियोजन करावे लागेल तर व्यावसायिकाला आपल्या व्यवसायातील कामाचे. म्हणजे सर्वत्र नियोजन आवश्यकच  आहे. जेवढे काटेकोर तुम्ही बारीक बारीक गोष्टींचे नियोजन कराल  तेवढी कामे यशस्वी होतील.  आपण  दिवसाचे, आठवड्याचे, महिन्याचे, वर्षाचे, पुढील पाच वर्षाचे नियोजन करू शकतो. पण नुसते कागदावर नियोजन करून भागणार नाही तर त्या नियोजनाची अंमलबजावणी देखील तेवढीच काळजी...
Image
                                                                                     स्वीट रिव्हेंज  स्वीट रिव्हेंज म्हणजे गोड बदला. तुम्ही म्हणाल बदला आणि गोड तो कसा काय ?  कोणीतरी आपला जिव्हारी लागणारा अपमान करतो. आपण आतल्या आत ज्याने अपमान केला त्याबद्दल राग ठेऊन कित्येक दिवस  धुमसत असतो . या अपमानाचा कधी मी बदला घेईन असे आपल्याला झाले असते. पण हि धुमस ऊर्जा म्हणून वापरली तर ? स्वतःला इतके मोठे केले कि सारे जग आपली  स्तुती करण्यास बाध्य होईल. तुम्ही म्हणाल कसे ते ? आपल्याला खालील तीन  उदाहरणावरून समजेल.  एकदा महात्मा गांधी आपल्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेमध्ये फर्स्ट क्लासचे तिकिटाने रेल्वेने प्रवास करत होते .   त्या काळात रंगभेदामुळे काळ्या लो...
Image
 "हलकं होऊया !उंच उडूया !!" आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो ज्या वाहनावर जेवढे जास्त  ओझे तेवढी त्याची गती धीमी. एखादी ट्रक  जड सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेत असते पण अगदी कमी गतीने. जहाज देखील एका बंदरापासून दुसऱ्या बंदरापर्यंत अनेक वजनाचे सामान घेऊन जाते पण अगदी धीम्या गतीने. पण जर आपण विमानाचा विचार केला तर विमानात एका क्षमतेपेक्षा जास्त सामान तुम्ही नेऊ शकत नाही म्हणून ते उंच आकाशात वेगाने उडते.  तुम्ही म्हणत असाल एवढी सारी प्रस्तावना कशासाठी. सांगतो सांगतो ! माणसाचे देखील असेच  आहे. जेवढ्या जास्त नको त्या विचारांचे ओझे घेऊन तो जीवनाचा प्रवास करेल तेवढा त्याचा वेग कमी होईल. नको त्या विचारांची जळमटे तुमची प्रगती मंद करतात. 'मागे या कामात मला अपयश आले होते आता परत मला ते काम जमणार नाही' . 'लोक काय म्हणतील?'. 'मला हे कसे जमेल?'. 'मागे एकदा मी फसलो होतो आता परत फसेन'. 'माझ्याकडे तर त्या कामासाठी आवश्यक असलेली साधने नाहीत मग ते काम मी कसा करू?'. 'त्याने माझा अपमान केला'. 'मागे एकदा ती संधी माझ्या हातून निसटली परत म...
Image
  " नको तुलना एकमेकांच्या मुलांची सुंदर बाग दिसते वेगवेगळ्या फुलांची" या लेखातील शीर्षकाच्या ओळी लहान मुलांच्या बाबतीत लिहल्या असल्या तरी त्या आपल्या सर्वांना लागू होतात . प्रत्येक मुलं जस वेगवेगळे आहे आणि जेव्हा पालक आपल्या मुलांची इतर मुलांबरोबर तुलना करत असतात तेव्हा ते आपल्या  मुलांवर नकळत अन्याय करत असतात. आपण देखील आपली तुलना इतरांसोबत करतो तेव्हा आपणही स्वतःवर अन्यायच करत असतो.  प्रत्येक व्यक्ती हा निराळा आहे. त्याचे जीवनातील प्राधान्यनक्रम वेगळे आहेत. त्याला मिळालेली परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहेत. सुख दुःखाच्या कल्पना वेगळया आहेत. तेव्हा एकमेकांची तुलना करून कसे चालेल. आणि जरी केली तरी ती माझ्या मते न्याय ठरेल असेही  नाही. तेव्हा तुलनेचा विचार हा व्यर्थ आहे.  अगदी तुलना करावयाचीच असेल तर स्वतः ची स्वतःचीच करा. आपल्या आत्तापर्यंतच्या जगलेल्या आयुष्याचे सिंहावलोकन करा. नक्कीच तुम्हाला बदल जाणवलेला दिसेल. अगोदर तुम्ही कोणावर तरी अवलंबून होतात आज कोणीतरी तुमच्यावर अवलंबून असेल. आपल्या जाणीवा आधीपेक्षा अधिक सजग झालेल्या असतील. वागण्या बोल...
Image
                                                                                             "जीवनाचा प्रत्येक टप्पा आनंददायी" बालपण, तरुणपण, प्रौढपण, म्हातारपण हे जीवनाचे मुख्य चार टप्पे. तसं पाहीलंतर जीवनातील या चारही टप्प्याची गोडी काही औरच आहे. फक्त बालपणाचाच काळ सुखाचा असे म्हणणे काहीसे चुकीचे वाटते. अर्थात बालपणात काही जबादारी नसल्यामुळे, सर्व बाजूने लाड व काळजी घेत जाण्यामुळे हा काळ सुखाचा नक्कीच वाटू शकतो त्याच्या गोड आठवणी प्रत्येकाच्या ह्रदयात कायम वास्तव्यास असतात. या काळात केलेली दंगामस्ती, विविध खेळ, पहिली शाळा , पहिला गणवेश, विविध स्पर्धेत घेतलेला भाग, मिळवलेली बक्षिसे , सहली सारेच काही मजेशीर.  जीवनातील दुसरा टप्पा म्हणजे तरुणपण. प्रचंड उत्साहाचा, ऊर्जेचा काळ. स्वतःबरोबर दुसऱ्याच्याही प्रेमात पडण्याचा काळ. नवी नवी स्वप्न पाहण्याचा काळ. ...
Image
                                                       "सोशल मीडिया आणि आपण" सोशल मीडियाने आपलं रोजचं जगणं व्यापून टाकलेले आहे. व्हाट्सअँप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्युब  हे शब्द परवलीचे झाले आहेत. रोजचा काहीना काही वेळ आपण यावर घालवतच  असतो. काही वेळ ठीक आहे पण वेळेला बंधन नसेल तर?. कामाची महत्वाची वेळ यासाठी जात असेल तर ?. याचे व्यसनच लागले असेल तर , म्हणजे मी माझा पूर्ण दिवस किंवा दिवसातील जास्तीत जास्त वेळ यासाठी देत असेल तर ? या तर तर च्या गोष्टी धोक्याच्या आहेत.   दिवसभराच्या कामाच्या ताणातून थोडा विरुंगुळा म्हणून सोशल मीडियाचा वापर यात काही वावगे नाही. पण तासोंतास  याचा वापर करणे म्हणजे वेळेचा अपव्यय होय. आणि याचे व्यसनच लागले असेल तर वेळीच यातून बाहेर पडणे हिताचे ठरते. जेवढा याचा अतिवापर तेवढे याचे व्यसन लागण्याची शक्यता जास्त. याचे व्यसन लागलेल्या व्यक्तीचे सोशल मीडिया हेच जग बनते. तो माणसांपासून अलिप्त राहतो...
Image
  "दिल पे मत लो यार"  त्याचे किंवा तिचे बोलणे माझ्या मनाला खूप लागले, तिच्या /त्याच्या बोलण्याने माझे मन खट्टू झाले, अमक्याच्या बोलण्याने माझा मूड खराब झाला, सकाळी सकाळी तो किंवा ती मला असे बोलण्याने माझा अख्खा दिवस खराब गेला इत्यादी इत्यादी तक्रारीचा सूर आपण स्वतः तरी लावत असतो  किंवा कोणाच्या ना कोणाच्या तोंडून तो ऐकत असतो. यातील मुख्य मुद्दा तो हा कि बोलणाऱ्याचे यात काहीही जात नाही . तो बोलून मोकळा होतो . त्याचा/तिचा दिवस खराब जात नाही . आपण मात्र दिवसभर, काही काही जण तर काही दिवस ते बोलणे मनाला लावून  घेऊन कुढत बसतात. कामावरील त्यांचे लक्ष उडते. काही हळव्या मनाच्या लोकांच्या तब्येतीवर देखील याचा परिणाम होतो. मग याला काही उपाय आहे का नाही ? तर याचे उत्तर आहे निश्चित आहे. पहिला हा विचार करा आपल्याला कोण काय बोलेल हे आपल्या हातात आहे का ? तर निश्चित नाही.  प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्ती आपल्याशी छान छानच बोलेल असं कधी होत का ? तर  नाही. तर मग आपल्या हातात काय उरतं तर बोलणं मनावर न घेणं. आपण काही मशीन नाही आहोत ऑन ऑफ व्हायला  कि इतरांच्या चांगल्या बोल...
Image
  "कृतज्ञता व्यक्त करा " मान्य जीवनाची वाटचाल करत असतांना मोठी स्वप्न पहावीत , महत्वकांक्षा ठेवावी . त्या स्वप्नांचा, महत्वकांक्षेचा कशोशीने पाठलाग करावा . त्यासाठी पाहिजे तेवढे कष्ट,  धडपड करण्याची तयारीही ठेवावी. पण  हे करत असतांना जे सध्या आपल्याजवळ आहे त्याचे काय? त्याबद्दलची   कृतज्ञता कधी आपल्या मनात  उमटते का ? नसेल तर आपल्या सारखे करंटे आपणच . आपल्या शास्त्रात  म्हटले जाते ८४ लाख योनिचा प्रवासा  नंतर माणसाचा जन्म होतो . अशा  आपल्याला मिळालेल्या अमूल्य मानवी  जीवना बद्दल आपण  कृतज्ञ आहोत का ?   दुर्देवाने  जगात कितीतरी जणांना जन्मतः अपंगत्व असेल आपल्याला ते नाही  या बद्दल   आपण  कृतज्ञ आहोत का ?  गरीब किंवा श्रीमंत घरात जन्म घ्यावा हे आपल्या हातात नाही . परंतु लहानपणीच गरिबीचे चटके न बसता आपण  त्या  मानाने खात्यापित्या, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत घरात जन्माला आलो त्यासाठी आपण कधी आभार व्यक्त केले आहेत का ?  कोणा माता-पित्याच्या पोटी आपण जन्म घ्यावा हेही आपल्या हातात नाही. ...
Image
" सकारात्मक स्व - संवाद महत्वाचा  " लोक आपल्याविषयी काय बोलतात या पेक्षा आपण स्वतः विषयी काय बोलतो हे जास्त महत्वाचे ठरते . आपली स्वतः ची प्रतिमा आपल्या मनात कशी आहे , ती सकारात्मक आहे का नकारात्मक या वरून आपले व्यक्तिमत्व बनत असते .   यावरूनच आपली आयुष्याची वाटचाल सुलभ किंवा कठीण    होते . ' माझे नशीबच खोटे आहे ' , ' मी दिसायला कुरूप आहे ', ' मला    सतत अपयशच येते ',  ' माझी   परिस्थिति वाईट आहे   ',' हे जग चांगले नाही  ' , ' माझ्या हातून काहीही होणार नाही ',   या आणि या सारखे इतर   नकारात्मक संवाद आपण स्वतःशी करत असूत तर आयुष्यात चांगले काही घडण्याची आपण अपेक्षाच   कशी ठेवू शकतो ?. आपली सर्व शक्ती आपण नकारात्मक विचारात , संवादात खर्च करत असूत तर आपल्या हातून नवंनिर्मिती   होणार कशी ? आपण   आपली प्रगती कशी साधणार ?. शारीरिक व्यंगावर एखाद्यावेळेस मात करता येऊ शकेल पण मनाच्या व्यंगाचे काय ?. या वरून सकारा...