तो भारत माझा
क्रांतीवीर जिथे गेले फासावरती,
पवित्र आहे जिथली माती,
तो भारत माझा!
तिरंगा फडके जिथे डौलात,
संत जन्मले ज्या भूमीत,
तो भारत माझा!
पृथ्वीला जो कुटूंब मानतो,
जगाला मानवतेचा संदेश जो देतो,
तो भारत माझा!
सर्व धर्माचा जिथे आदर,
ज्ञानाचे जिथे समृद्ध भांडार,
तो भारत माझा!
जन-गण -मन जिथे प्रत्येक मनात,
संस्कृती जिथे पुजतात,
तो भारत माझा!
पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा जिथे,
हसत हसत प्राण द्यावा तिथे,
तो भारत माझा!
तो भारत माझा!
(महेश भा. रायखेलकर)

Comments
Post a Comment