घोटाळे
घोटाळे घोटाळे खंडीभर घोटाळे
देशाचे केले यांनी पुरते वाटोळे
काल कोणी मल्ल्या आज कोणी मोदी
करून घेतली यांनी स्वतःची चांगली चांदी
सामान्यांना कर्ज देतांना बँका येती आड
यांच्यासाठी बँकांची तिजोरी उघड, सताड
कोणाचेही असुदे देशात सरकार
परदेशी होती बिनबोभाट हे पसार
जनता भरती प्रामाणिकपणे कर
हे लबाड होती चोरावर मोर
कायदा व्यवस्थेचे नसे यांना कोणतेही भय
बगलबच्चांनी करून ठेवलीय सर्व यांची सोय
आणा यांना फरपडत विदेशातून देशात
टाका आजन्म या सर्वांना बंद कोठडीत
फिरवा यांच्या संपत्तीवर पुरता वरवंटा
देशाची केली यांनी क्रूर चेष्टा
कायदा व्यवस्था करावी अशी कडक
गुन्हे करण्याआधीच बसावा त्याचा धाक
जनतेने ना बसावे नुसते थंडगार
आवाज उठवून हादरून टाकावे सरकार
शत्रुंना मारण्यास सज्ज सैनिक सीमेवर
देशातील चोरांना दयावा जनतेने मार
केले आपण आजपर्यंत खूप काही सहन
सगळे मिळून वाढवूया देशाची शान
© महेश भा. रायखेलकर
Comments
Post a Comment